Home लक्षवेधी अभिनंदनीय :- मनसे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्या नवनिर्माण संकल्प जनआशिर्वाद यात्रेला उत्कृष्ट...

अभिनंदनीय :- मनसे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्या नवनिर्माण संकल्प जनआशिर्वाद यात्रेला उत्कृष्ट प्रतिसाद.

लातूर ग्रामीण विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांच्या सहभागाने गावागावातील मनसेची हवा.

लातूर :-

मनसेचे लातूर ग्रामीण विधानसभेचे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गावागावात नवनिर्माण संकल्प जनआशिर्वाद यात्रेला शेतकऱ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळतं आहे, गावागावात छोटेखानी बैठका व शेतकऱ्यांशी संवाद साधत मनसेचे उमेदवार नागरगोजे यांनी मनसेचं वातावरण तयार केले आहे, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा शेतकऱ्यांचा लढवय्या नेता म्हणून नागरगोजे यांची ओळख लातूर जिल्ह्यात असल्यामुळे व शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलन करून न्याय मिळवून दिल्यामुळे लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात मनसे उमेदवार निश्चितपणे निवडून येईल अशी जोरदार चर्चा रंगली

दरम्यान या मतदारसंघातील रेणापूर तालुक्यातील मौजे –दिवेगांव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संतोष नागरगोजे यांच्या हस्ते पार पडला यावेळी त्यांनी गावकरी बांधवांशी संवाद साधला, त्यांचे जनसंपर्क कार्यालय पानगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधून मुशिराबाद येथील गावकरी बांधवांशी साधत मतदानरूपी आशीर्वाद देण्याची त्यांनी विनंती केली.

यावेळी मनसे शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष भागवत शिंदे,मनसे शेतकरी सेना राज्य सचिव भागवत कांदे,देवा पवार,बळीराम सुडे,पानगाव ग्रामपंचायत सदस्य सुरेश गालफाडे,दिवेगाव ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कांदे,दिवेगाव पोलीस पाटील रामकिसन कांदे,नरेश कांदे,अंगद कांदे,बाबुराव कांदे,पांडुरंग डुकरे,मल्हारी डुकरे,मोहन उपाडे,अनुरथ भालेराव,श्रीमंत भालेराव,रवी वाघमारे,दिनेश कसबे,नारायण भालेकर,बालाजी भालेकर,राम घोडके तर पानगाव येथे चेतन चौहान,मुसळेवाडी सरपंच सुधीर कुंटेवाड,अविनाश वाघमारे,बालाजी माने,सुनील केंद्रे,महादू शिरसाट,शहेनशाह सय्यद,विनायक तिडके,गोविंद केंद्रे, रोहीत सारोळे,विशाल मलवाडे,संजय सुरवसे,आशिष मलवाडे,धीरज जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here