शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम सैनिक नव्हते, भाजपचा नवा इतिहासकार नितेश राणे यांचा जावईशोध.
हे राज्य औरंगजेबाच्या विचारांनी चाललेय की काय बच्चू कडू यांचा घणाघात.
लक्षवेधी :-
ज्या शिवछत्रपतींनी अठरापगड जातींची एक मोट बांधून स्वराज्य निर्माण केले होते. या राज्यावर परकीय आक्रमण करणाऱ्यां मोगलांना हाकलून लावलं, स्वराज्यांच्या लढाईत शिवरायानी मराठा, दलित, आदिवासी यांच्यासह मुस्लिम समुदायतील तरुणांना सैन्यात घेऊन अनेक लढाया जिंकल्या, त्यात सिद्दी इब्राहिम हे शिवरायांचा तोफखान्याचे प्रमुख होते. त्यांनी अनेक युद्धात महत्त्वपू्र्ण भूमिका घेतली आहे. दौलत खान हे पण महत्त्वाच्या पदावर होते त्यांनी शिवरायांच्या अनेक मोहिमांमध्ये साथ दिली, सिकंदर हे छत्रपती शिवाजी महाराजांचा खास अधिकारी त्यांच्यावर किल्ल्यांच्या रक्षणाची जबाबदारी होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात हिंदू आणि मुस्लिम सैनिकांचा सहभाग होता. तर गनिमी काव्यात सुद्धा अनेक मुस्लिम निष्ठावंत सैनिक आणि सरदारांनी स्वराज्य स्थापनेत मोठे योगदान दिले होते, मात्र कधी काळी कांग्रेस मध्ये सत्ता भोगणारे व मुस्लिम कबरीवर आणि दर्ग्यावर नतमस्तक होणारे नितेश राणे यांच्या वडिलांनी भाजप प्रवेश केल्यानंतर हे अचानक हिंदुत्ववादी झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम सैनिक नव्हता हा जावई शोध त्यांनी लावला. खरं तर भाजप ने नितेश राणे हा नवा इतिहासकार निर्माण केला की काय? हा प्रश्न उभा राहत आहें, जिथे राज्यात आणि केंद्रात भाजप ची सत्ता आहें तिथे भाजप ला औरंगजेबाची कबर काढून टाकण्यास कोण मनाई करतो? पण यांना राज्यातील मुळ प्रश्नांना बगल देण्यासाठी औरंगजेबाची कबर बाहेर काढावी लागतं आहें हे जनतेनी समजून घ्यायला हवे.
छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदूचा राजा आहें हे समोर करून मुसलमान असलेल्या औरंगजेब च्या कबरी चा विषय नितेश राणे यांनी बाहेर काढला, ज्यामुळे नागपूर सारख्या शांत शहरात धार्मिक दंगली घडविल्या गेल्या ज्या समाजाला घातक ठरत आहें. खरं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल ही अपेक्षा होती, राज्यातील लाडक्या बहिणींना 1500 वरुन 2100 रुपये मिळेल ही अपेक्षा होती आणि तरुण बेरोजगार यांना रोजगारांच्या नव्या संधी या निमित्याने निर्माण होईल ही अपेक्षा असताना त्याचा अर्थसंकल्पीय बजेटमध्ये कुठेही उल्लेख नाही आणि राज्यात खुनाच्या घटना, बलात्काराच्या घटना यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहें, त्यामुळे जनतेचे लक्ष या मुळ प्रश्नावरून हटाविण्यासाठी सत्ताधारी नेत्यांनी औरंगजेब यांच्या कबरीचा विषय बाहेर काढून धार्मिक दंगली घडविल्या आहें, कारण औरंगजेबाची कबर औरंगाबाद इथे असतांना नागपूर येथे तो विषय कशासाठी भडकतो हा संशोधनाचा विषय असून नितेश राणे पुरस्कृत ही दंगल असल्याचे बोलल्या जातं आहें, जिथे राज्यातील महागाई, बेरोजगारी, बलात्कार व शेतकरी कर्जमाफीसारखे प्रश्न आ वासून उभे असतांना औरंगजेबाच्या कबरीचा विषय बाहेर काढून हे महायुती सरकार राज्यातील जनतेला मूर्ख बनवतंय असेच एकूण चित्र दिसत आहें.
काय आहें खरा इतिहास?
सध्या मराठा इतिहासावर प्रकाश टाकणारी काही पुस्तके पुराव्यासह उपलब्ध आहेत. पण ती वाचण्याची हिंमत कोण करतो? त्रास कोण घेतो? त्यातच उचलली जीभ लावली टाळूला अशी अवस्था असणाऱ्या मंत्री नितेश राणे यांना भाजपने विरोधकांवर भुंकायला मोकळे सोडले आहें, त्यातच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुसलमान सैनिक नव्हता हा जावई शोध करून हिंदू मुस्लिम विषय पेटवला, खरं तर ज्यांनी इतिहासचं वाचला नाही ते वर्तमानात इतिहास घडवू शकत नाही त्यामुळे स्वराज्य स्थापनेत मुस्लिम सैनिकांचे योगदान होते की नाही याचे उत्तर ऐकून घेण्यासाठी अगोदर आपल्याला इतिहास वाचवा लागेल, शिवाछत्रपती च्या सैन्यात जे मुस्लिम सरदार व सैन्य होते त्यांचे काही उदाहरणं
*सिद्दी इब्राहिम : शिवरायांचा तोफखान्याचे प्रमुख होते. त्यांनी अनेक युद्धात महत्त्वपू्र्ण भूमिका घेतली आहे.
*दौलत खान : हे पण महत्त्वाच्या पदावर, शिवरायांच्या अनेक मोहिमांमध्ये होता सहभाग
*सिकंदर : छत्रपती शिवाजी महाराजांचा खास अधिकारी, त्यांच्या किल्ल्यांच्या रक्षणाची जबाबदारी सिकंदर यांच्यावर होती.
*मुस्लिम मावळे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात हिंदू आणि मुस्लिम सैनिकांचा सहभाग होता. तर गनिमी काव्यात सुद्धा अनेक निष्ठावंतर सैनिक आणि सरदारांचा समावेश होता.
स्वराज्याचा पायाच सहिष्णुतेवर.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य निर्मिती केली. अठरापगड जातींना एकत्र करून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. ते प्रत्येक धर्माचा सन्मान करत होते. त्यांची लढाई ही मुघलांविरोधात होती. त्यांचे युद्ध एका धर्माविरुद्ध नव्हते. त्यांनी कधी मंदिर आणि मशिदीत भेद केला नाही. त्यांच्या सैन्यात भरती होण्यासाठी हिंदू-मुस्लिम असा भेद करण्यात येत नव्हता. योग्यता आणि स्वराज्यावरील निष्ठेवर सैन्यात भरती होत होती. त्यामुळेच अनेक मुस्लिमांनी स्वराज्याच्या लढाईत हिरारीने सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते. त्यांनी मुघलांच्या अत्याचाराविरोधात संघर्ष केला व त्यांनी धार्मिक सहिष्णुता जपली, त्यांचे सैन्य जिथे जात होती. त्या क्षेत्रातील मशिदी आणि दर्ग्यांना धक्का न लावण्याची सक्त ताकीद होती. त्यांना नुकसान न पोहचवण्याचे आदेश सैनिकांना होते.
हे राज्य औरंगजेबाच्या विचारांनी चाललेय की काय -बच्चू कडू
एकीकडे भाजप मंत्री नितेश राणे महाविकास आघाडी च्या नेत्यांना औरंगजेबाच्या नावाने उपमा देतात व शिवाजी महाराज हे हिंदूचे राजे होते हा उल्लेख करून त्यांच्या सैन्यात एकही मुस्लिम सैनिक नव्हता असे जाहीर करतात, दुसरीकडे मात्र महायुती सरकारचा कारभार हा पूर्णपणे एकाधिकारशाहीने होत असून शेतकऱ्यांची कर्जमाफी सारख्या मुद्द्यावर निवडनुकापूर्वी सरसकट कर्जमाफी ची घोषणा करून सुद्धा त्यावर सरकार कर्जमाफीचा क म्हणायला तयार नाही यावरून हे सरकार औरंगजेबाच्या विचारांनी चाललेय का हा प्रश्न निर्माण होत आहें, असा प्रश्न माजी आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहें. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा सभागृहात महायुती सरकारचे कान टोचत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा त्यांचे परिणाम भयंकर होईल असा इशारा पण दिला आहें, त्यांनी म्हटले की कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करायला सरकार कडे पैसे आहेत तर मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफिसाठी सरकारकडे पैसे नाहीत का असा प्रश्न पण मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.