अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
अमृत योजना व वडगाव प्रभागातील जलद समस्यांवर मनपा आयुक्ताशी चर्चा करून निवेदन……
चंद्रपूर :- चंद्रपूर मधील महानगरपालिका कोणत्या ना कोणत्या कारणास्त्र नेहमी चर्चेमध्ये असतातच आणि आता सुद्धा एक जलद विषयावर चर्चेत आहे, म्हणजे अमृत योजना अमृत योजना ही चंद्रपूर वासीयांना मुबलक पाणी आणि 24 तास पाणीपुरवठा देण्याच्या उद्देशाने हे स्कीम चंद्रपूर मध्ये आणण्यात आली,
इतकेच नाहीतर मनपा यांनी प्रचार किंवा नियोजनही सुद्धा असे करण्यास व सांगण्यात आले होते की नागरिकांचे खरंच मन भरून आल्या सारखी ही योजना होती, अमृत म्हणजे खरंच जसे 24 तास पाणी मिळणार अशी आशा चंद्रपुरातील नागरिकांना होती,
परंतु हे तीन वर्षाची योजना केव पाच ते सहा वर्ष लोटून गेले हे चंद्रपुरातील नागरिकांना अजूनही समजले नाही इतकेस नाही तर अजूनही मात्र अमृत योजना पूर्ण झालेली नाही इतकेच नाही तर *सर्वीकडे नळ तर आहे पण पाणी नाही* अशी ही योजना मनपा आयुक्त ची दिसत आहे,
मात्र या योजनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या कंत्राटी ठेकेदाराला ही योजना चालवण्यास दिली होती त्यांचे बिल मात्र पूर्ण देण्यात आले म्हणजे महानगर पालिकेतील आयुक्तांनी बिना सहानिशा किंवा कोणतीही प्रकारची माहिती अथवा पाहणी न करता या कंत्राटी ठेकेदाराला बिल पूर्ण कसे का दिले ? हे चंद्रपुरातील नागरिकांना आश्चर्यजनक दिसू लागली,
आणि आता सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे व या उन्हाळ्यात जेमतेम सर्वच चंद्रपुरातील नागरिकांना पाण्याची समस्या दिसून येत आहे, कारण चंद्रपुरातील उष्णता इतकी आहे की या उष्णता मुळे कोणाचे बोरिंग सुकले तर विहिरी सुद्धा आटल्या तर कोणाकडे काहीच नाही सध्या सर्व चंद्रपुरातील नागरिक नळाच्या पाण्यावर अवलंबून आहे, व मनपा पाणीपुरवठाचे टँकर सुद्धा बोटावर मोजण्याइतकेच आहे,
त्यामुळे चंद्रपुरातील नागरिकांना नळ तर अमृतचे आहे पण पाणी नाही अशी अवस्था येथे दिसून येत आहे, आणि टँकरने पाणी पुरवणे हे मनपा पाणीपुरवठा विभागांना शक्य नाही म्हणजे आयुक्तांनी फक्त सुस्त बसून बघण्याची भूमिका केलेली आहे, की काय असा प्रश्न? सध्या चंद्रपुरातील नागरिकांना पडलेला आहे,
चंद्रपुरातील नागरिकांची अशी अवस्था व वारंवार अमृतच्या पाण्याच्या तक्रारी लक्षात घेता माजी नगराध्यक्षा व माजी नगरसेविका सौ सुनीता लोढिया यांच्याकडे येत असल्यामुळे आज दि, 16,05,2024, ला यांनी आज मनपायुक्तांशी भेट घेऊन अमृत पाणीपुरवठा नळ आहे पण पाणी नाही असे सांगता व वडगाव प्रभागातील सिटी प्लान नुसार मोठे रस्ते, सिटी प्लॅन नुसार नाल्या, तसेच दत्तनगर मधील मागील वेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते त्यासोबतच वडगाव मधील मागील भाग सुद्धा
पूर्णपणे पाण्याने डुबलेला होता यावेळी पुन्हा तेस परिस्थिती निर्माण नाही व्हावी या साठी त्यांच्यावर पावसाळ्या लागण्याच्यापूर्वी उपयोजना करण्यात यावी म्हणून नाला, मोठ्या नाल्या व तसेच परिसरातील नाल्या सुद्धा साफ सफाई करून पूर्व योजना करण्यात यावी असे विविध विषय घेऊन माजी नगरसेविका सुनीता लोढिया यांनी आज मनपा आयुक्ताशी चर्चा करून निवेदन देण्यात आले,
यावेळेस वडगाव प्रभागातील नागरिकानी सुद्धा उपस्थिती दाखवली भाविक येरगुडे, दीपक बिलबिले ,नत्थु येरगुडे ,उषा येरगुडे ,पूर्वा येरगुडे शारदा पाऊनकार, छाया येरगुडे ,माला पाऊनकार सुनीता पाऊनकार ,माया मशिरकर ,आशा पंचभाई ,निशा पाऊनकार जयश्री पाऊनकार, प्रियंका खामनकर, उपस्थित होते