Home भद्रावती मनसे जनहित विधी विभागाचे सरचिटणीस महेश जोशी यांच्या वाढदिवशी फळवाटप.

मनसे जनहित विधी विभागाचे सरचिटणीस महेश जोशी यांच्या वाढदिवशी फळवाटप.

भद्रावती सरकारी रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून साजरा केला वाढदिवस.

भद्रावती:- 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित विधी विभागाचे राज्य सरचिटणीस महेश जोशी यांच्या दिनांक 6 सप्टेंबरच्या वाढदिवशी जनहित कक्ष विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुनील गुढे व रमेश काळबांधे यांच्या पुढाकाराने भद्रावती येथील सरकारी रुग्णालयात फळवाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष उमाशंकर तिवारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित विधी विभागाचे सरचिटणीस महेश जोशी यांनी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना मदत केली असुन त्यांच्या समस्या विभागीय स्थरावर त्यांनी सोडवल्या आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे कट्टर प्रचारक व पक्षहितासाठी लढणारे लढवय्ये महाराष्ट्र सैनिक म्हणून त्यांची ओळख असुन पक्ष संघटन वाढीसाठी त्यांनी चालवलेले प्रयत्न निश्चितच पक्षाला उभारी देणारे आहे. अशा कर्तबगार नेत्यांना पुढील आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी व त्यांना दीर्घायुषी होण्यासाठी आपण त्यांचा वाढदिवस साजरा केल्याची भावनिक प्रतिक्रिया मनसे पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. यावेळी इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Previous articleत्या अपघातग्रस्त शिक्षिकेच्या मृत्युला गायत्री टायरचे मसादे जबाबदार ?
Next articleभयानक :- त्या शिक्षिकेचा कसा झाला अपघात? व्हीडिओ वरून वास्तव आले समोर,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here