Home चंद्रपूर त्या अपघातग्रस्त शिक्षिकेच्या मृत्युला गायत्री टायरचे मसादे जबाबदार ?

त्या अपघातग्रस्त शिक्षिकेच्या मृत्युला गायत्री टायरचे मसादे जबाबदार ?

दुकान रस्त्यावर आल्याने स्कॉर्पिओ गाडी रिवर्स घेतांना स्कूटी चालक महिलेचा मृत्यु. मसादेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

साई मंदिराचे पुजारी रामप्रसाद मसादे यांचे चंद्रपूर नागपूर रोडवर एक बेकायदेशीर अतिक्रमण असलेले गायत्री टायर पाडण्यात आले होते, त्यानंतर त्याच रोडवर पुन्हा दुसरे गायत्री टायर दुकान त्यांनी पुन्हा सुरू केले दरम्यान ते दुकान सुद्धा रस्त्यावर आल्याने गाड्यांचे आलायमेंट करतांना त्या गाड्या जेंव्हा रिवर्स येतात तेंव्हा मुख्य रस्त्याने कोणत्या गाड्या धावत आहे याचे भान नसते त्यामुळे सरळ येतं असलेल्या गाडय़ांना या गायत्री टायर मधून आलायमेंट करून निघणाऱ्या गाड्यांची टक्कर होण्याची शक्यता असते आणि दिनांक 04,,09,,2023, ला सकाळी 10,,00 ते 10,,30 च्या सुमारास चंद्रपूर-नागपूर महामार्गावर 48 वर्षीय अनिता किशोर ठाकरे श्रीकृपा कॉलोनी, जगन्नाथ बाबा नगर चंद्रपूर या शिक्षिकेच्या झालेला अपघात हा असाच झाला आहे. स्कॉर्पिओ ने रिवर्स घेतांना स्कूटीवर येणाऱ्या शिक्षिकेला धडक दिली आणि त्या भरधाव येणाऱ्या ट्रक खाली फेकल्या गेल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला, या अपघाताला सर्वश्री जबाबदार गायत्री टायर चे मालक रामप्रसाद मसादे यांचे रस्त्यावर असणारे अतिक्रमण असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांचे रस्त्यावर आलेले दुकान तोडण्यात यावे अशी मागणी जोर पकडू लागली आहे.

एकीकडे साई बाबा ची पूजा आराधना करायची आणि दुसरीकडे अवैध बांधकाम करून कधी दुसऱ्याचा रस्ताच अडवायचा तर कधी दुसऱ्याचा जीव जाण्यास जबाबदार ठरायचे हा असला प्रकार साई मंदिराचे पुजारी रामप्रसाद मसादे हे करीत असुन त्यांनी स्वतःचे घर बांधताना सुद्धा नियमानुसार बांधकाम केले नसल्याने त्या विरोधात महानगरपालिका कार्यालयात तक्रार दाखल आहे, पण पूजेच्या नावाखाली सगळ्या राजकीय व प्रशासकीय यंत्रणेकडून सहानुभूती मिळवून स्वतःचे अवैध बांधकाम वाचवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न होत असते पण जर यामुळे लोकांचे जीव जातं असतील तर त्यांच्या अवैध बांधकामावर कारवाई झालीच पाहिजे आणि महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ हे अवैध बांधकाम तोडावे अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here