Home गडचिरोली गडचिरोली – चिमूर लोकसभा : प्रचाराचा अंतिम दिवस – अंतिम तास!

गडचिरोली – चिमूर लोकसभा : प्रचाराचा अंतिम दिवस – अंतिम तास!

गडचिरोली – चिमूर लोकसभा :
प्रचाराचा अंतिम दिवस – अंतिम तास!

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आज संपूर्ण गडचिरोली शहरातून पाच किमी रॅली काढण्यात आली. उन्हाच्या कडक्यात पण काँग्रेसने धडाक्यात प्रचार केला. यात शहरातील अभिनव लॉन, आठवडी बाजार,हनुमान मंदिर,भडांगे मोहोल्ला,भोई, माळी व वंजारी समाज मोहोल्ला,राममंदिर,इंदिरा गांधी चौक,शिवाजी महाराज विद्यालय ते अभिनव लॉन अशी पदयात्रा रॅली काढण्यात आली.

यंदा कार्यकर्ते गाफील राहणार नाही. भाजपवाले विविध आमिषे दाखवून मन वळवण्यासाठी प्रयत्न करतील त्यामुळे नागरिक सुद्धा सावध झाले आहे. गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रातील मतदार जागरूक राहून इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आणि यंदा काँग्रेसचा उमेदवार ऐतिहासिक मताधिक्याने निवडून आणणार .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here