Home Breaking News चंद्रपूर आम आदमी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या निवासस्थानी आणि कारखान्यात पोलीस...

चंद्रपूर आम आदमी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या निवासस्थानी आणि कारखान्यात पोलीस तपासणी…

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

तपासणीदरम्यान पोलिसांना कोणतीही आक्षेपार्ह वस्तू किंवा अवैध शस्त्र आढळले नाही

आप च्या जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार याने कोणताही आक्षेप न घेता त्यांनी पोलिसांच्या या कृतीचे स्वागत केले…

चंद्रपूर  :-  चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या बंदुकीच्या हत्या आणि अवैध शस्त्रांच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक पोलिसांनी आम आदमी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या निवासस्थानी आणि कारखान्यात अचानक तपासणी केली. गुरुवार, 7 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता झालेल्या या कारवाईत सुमारे 25 ते 30 पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली.

तपासणीदरम्यान पोलिसांना कोणतीही आक्षेपार्ह वस्तू किंवा अवैध शस्त्र आढळले नाही. या वेळी जिल्हाध्यक्षांचे वडील, पत्नी आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा घरात उपस्थित होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा तयार केला, ज्यात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की ही तपासणी गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली होती आणि तपासणीदरम्यान कोणतेही शस्त्र किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या नाहीत.

लक्षणीय बाब म्हणजे, या अचानक झालेल्या तपासणीबद्दल आप च्या जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार याने कोणताही आक्षेप घेतला नाही. उलट, त्यांनी पोलिसांच्या या कृतीचे स्वागत केले, जे आम आदमी पक्षाच्या पारदर्शकता आणि प्रामाणिकतेच्या मूल्यांशी सुसंगत आहे. त्यांनी सांगितले, मी एका प्रमुख राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष असूनही पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे माझ्या घरी तपासणी केली, याचे मी स्वागत करतो. हे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे उत्तम उदाहरण आहे.

जिल्ह्यातील अलीकडील घटनांबद्दल बोलताना त्यांनी चिंता व्यक्त केली. गेल्या दोन-चार महिन्यांपासून जिल्ह्यात बंदुकीने हत्या करण्याचे सत्र सुरु आहे. अनेकांकडे बंदुका व कारतुसे सापडत आहेत. नुकतीच 40 कारतुसे सापडण्याची मोठी घटना घडली. ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.

याच संदर्भात, काही स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या चिंतेनुसार, जिल्ह्यातील काही राजकीय नेते आणि पदाधिकारी अवैध रेती उत्खनन, कोळसा तस्करी आणि जमीन हडपण्यासारख्या गैरकृत्यांमध्ये सहभागी असल्याची शक्यता आहे. या अवैध कृत्यांमधून मिळणारा पैसा स्थानिक गुन्हेगारी वाढवण्यास कारणीभूत ठरत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, काही राजकीय निरीक्षकांनी या घटनेवर भाष्य करताना म्हटले आहे की, पुढील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला बदनाम करण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो. तथापि, पोलीस तपासणीत काहीही आक्षेपार्ह न सापडल्याने हा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे उलट आम आदमी पक्षाच्या पारदर्शकतेवर प्रकाश पडला असून, विरोधी पक्षांच्या राजकीय डावपेचांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here