Home गडचिरोली भाजपाचा कार्यकर्ता बुथावरिल शूरवीर,मावळे, कणा व प्रमुख असुन विजयाचा शिल्पकार असतोय ...

भाजपाचा कार्यकर्ता बुथावरिल शूरवीर,मावळे, कणा व प्रमुख असुन विजयाचा शिल्पकार असतोय मा.खा.अशोक नेते यांचे चामोर्शीत शहर व तालुका कार्यकारणी बैठकीत प्रतिपादन

मागील दहा वर्षात लोकसभा क्षेत्रात केलेले विविध विकास कामे जनतेच्या सेवेशी…

जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ वाघरे यांचा वाढदिवस साजरा

सावतेली समाज सभागृह चामोर्शी शहर व तालुका कार्यकारणीची बैठक संपन्न

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर 

गडचिरोली:-  चामोर्शी –भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्राची चामोर्शी शहर व तालुका कार्यकारणी बैठक सावतेली समाज सभागृह चामोर्शी येथे आयोजित करण्यात आली होती.

या भाजपा कार्यकारणी बैठकीला माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक जी नेते यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात समाजसेवेसाठी केले.मागील दहा वर्षात माझ्या लोकसभा क्षेत्रात अनेक विकासाची कामे केलेली आहे.रेल्वे वडसा गडचिरोली तसेच रेल्वेचे जिल्ह्यात ब्रॉडगेज सर्व्हे लाईन मंजुर,चिचडोह, कोटगल बँरेजेस,मेडिकल काँलेज,कृषी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ निर्मिती, सुरजागड लोह प्रकल्प,कोनसरी प्रकल्प तसेच साडे चौदा हजार कोटीचे विविध रस्त्यांची कामे असे अनेक विकासात्मक कामे केले् आहेत,ऐवढे विकासकामे करूनसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत लोकांना सांगण्यात आपण कमी पडलोय का? यांची खंत व्यक्त करत विरोधकांनी संविधान, तसेच महिलांच्या खात्यात महिन्याला खटाखट साडेआठ हजार असा खोटानाटा अपप्रचार करत मतदारांची दिशाभुल केले पण आता आगामी येणाऱ्या विधानसभेत विजय आपलाच होईल यासाठी माझ्या
कार्यकर्ते बंधु आणि भगिनींनो भाजपाचा कार्यकर्ता बुथावरिल शूरवीर,मावळे, कणा व प्रमुख असुन विजयाचा शिल्पकारच हा कार्यकर्ता असतोय असे प्रतिपादन मा.खा.अशोक जी नेते यांनी चामोर्शी शहर व तालुका कार्यकारणीच्या बैठकीच्या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना केले.

पुढे बोलतांना मि आमदार असतांना अगोदर चामोर्शी ग्रामपंचायत होती त्यावेळी सरपंच्या भाजपाचे जेष्ठ नेते माणिकजी कोहळे यांच्या पत्नी कोहळे ताई होत्या त्यावेळी मी आढावा घेऊन पाच कोटी रुपये मंजूर करत १५ % रक्कम भरावे लागत होते तेव्हा मि स्वतः पैसे भरून चामोर्शीतील जनतेला पिण्याचे पाणी शुद्ध मिळावा यासाठी प्रयत्न केला.व माझ्याच प्रयत्नाने चामोर्शीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढला. चामोर्शीत न्यायालय सुरू होण्यासाठी पुढाकार,तसेच पंढरपुर च्या धर्तीवर जी.आर काढून मान.सुधिरभाऊ मुनगंटीवार मंत्री महोदय यांच्या प्रयत्नाने मार्कंडा देवस्थानाचे काम, काल प.पूज्य संत मुरलीधर महाराज यांचा वाढदिवस होता मी त्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी मार्कंडा देवस्थानच्या कामासंबंधी काम हळुवारपणे चालू आहे अशी संबंधीत माहिती दिली असता महाराजांना मि आश्वासित करून अडीच कोटींच्या या कामाला गती येण्यासाठी संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून लवकरच भाविक भक्तांना दर्शनासाठी सोयीस्कर होईल अशी ग्वाही प.पुज्य संत मुरलीधर महाराजांना दिली. येणाऱ्या विधानसभेत या ही विकास कामाचा निश्चित फायदा होईल असे वक्तव्य यावेळी केले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या वाढदिवसा निमित्त मा.खा.नेते यांनी भाजपाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जीवन सुख, समृद्ध,आनंददायी, आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना करत पुढील भविष्याच्या राजकीय वाटचाली करिता वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापुन शुभेच्छा दिल्या…

यावेळी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,आमदार डॉ.देवरावजी होळी,ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबुरावजी कोहळे,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, तालुकाध्यक्ष आनंदजी भांडेकर, शहराध्यक्ष सोपानभाऊ नैताम,जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडी चे जिल्हा प्रभारी डॉ. मिलिंदजी नरोटे,डॉ. नितिनजी कोडवते,डॉ. चंदाताई कोडवते, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे,नगरसेविका रोशनीताई वरघंटे,बुद्धिजीवी प्रकोष्ठ चे माजी न्यायाधिश सुनील जी दीक्षित,युवा जिल्हा महामंत्री मधुकर जी भांडेकर,बंगाली आघाडी चे जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा,भाजपा नेते संजयजी पंदिलवार, युवा नेते तथा जिल्हा सचिव तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे दिलिपजी चलाख,जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निखिल धोडरे,ता.महामंत्री विनोद गौरकर,संजयजी खेडेकर, सोशल मिडीया चे प्रमुख तथा बंगाली समाजाचे नेते रमेशजी अधिकारी, शहर महामंत्री माणिक कोहळे, शहर महामंत्री वासुदेव चिंचघरे, शहर महामंत्री नीरज रामानुजमवार,शहर महामंत्री नरेंद्र अलसावर, अनिता राँय,माजी नगरसेविका कविता किरमे,युमो शहर अध्यक्ष भाविक आभारे, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here