वरोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या मनसेच्या या आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन.
वरोरा प्रतिनिधी :-
वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेपासून वंचित आहे त्यांना त्वरित कर्जमाफीची रक्कम त्यांच्या बैंक खात्यात टाकण्यात यावी, 2023 च्या सोयाबीन आणि कापूस चना या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात टाकावी व या विधानसभा क्षेत्रातील कंपन्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्यावा या मागणी करिता मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात वरोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन होणार असून या आंदोलनाला मोठ्या संख्येने शेतकरी, युवा कार्यकर्त्यांनी उपास्थित राहावे असे आवाहन मनसे तर्फे करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यात सततची नापिकी व कर्जाचा वाढता भार असह्य झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढल्या असल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारने २८ जून २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती, दरम्यान वरोरा भद्रावती या क्षेत्रातील जवळपास 15 हजार शेतकरी या कर्जमाफी योजनतेतून पात्र असतांना सुद्धा ते या कर्जमाफी पासून प्रशासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिले होते व राज्यात जवळपास 6 लाखापेक्षा जास्त शेतकरी वंचित राहिले होते, या संदर्भात शिंदे सरकारने मागील अधिवेशनात या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी घोषणा करून तालुका स्तरावरील सहाय्यक निबंधक यांना या संदर्भात याद्या तयार करण्याचे निर्देश दिले होते परंतु आजपर्यंत यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही, शिवाय मागील वर्षीच्या (2023) पीक विम्याचे जवळपास 80 टक्के पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही ते पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात टाकावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शासन प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे पण तारखावर तारखा विमा कंपनीच्या एजंट द्वारे देण्यात येत आहे, वरोरा भद्रावती या तालुक्यात असलेल्या कंपन्यामध्ये स्थानिक मराठी भूमिपुत्राना नौकऱ्या देण्यात येत असून बाहेरील प्रांतातील लोकांचा भरणा इथे होतं असल्याने स्थानिकावर अन्याय होतं असल्याने या सर्व कंपन्यातील कामगारांचे पोलीस व्हेरिफीकेशन करून बाहेरील प्रांतातील कामगारांना कंपनीतून काढून टाकण्यात यावे या मागण्या घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आज सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे, दरम्यान यावर शासन प्रशासनाने तोडगा काढून मागण्या मान्य केल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी, मोहित हिवरकर, संजय रेड्डी, विशाल देठे, राम पाचभाई, संदीप मोरे, किशोर धोटे, विनोद खडसंग, श्रीकांत तळवेकर, राजेंद्र धाबेकर, प्रतीक मुडे, प्रमोद हणवते, धनराज बाटबरवे, रंगनाथ पवार, बंडू आपटे पवन खापने, बाळू गेडाम इत्यादीनी केले आहे.