बाजार समिती सभापती डॉ देवतळे यांच्यावरील अविश्वास ठराव हवेतच विरल्याने जल्लोष तर विरोधकांचे मात्र तोंड पडले?
वरोरा प्रतिनिधी :-
वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणूकी नंतर आणि विधानसभा निवडणूकी नंतर राजकीय समीकरणे पूर्णतः बदललेली असून एकेकाळी ज्यांच्या विरोधात लढले तेच सोबत आले तर जे कधी विरोधात नव्हते तेच विरोधक बनले, दरम्यान कांदा घोटाळा व तारण घोटाळ्यात बाजार समिती अगोदरचं बदनाम झाली असताना अशा कुठल्याही बाजार समिती संचालकांनी याबाबत पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला नाही तर केवळ आपल्याला सत्ता कशी येईल यासाठीच सर्वजण प्रयत्नशील होते, दरम्यान आपले कुठलेही काम होतं नाही सभापती निर्णय घेत नाही आणि आपल्याला विश्वासात सुद्धा घेत नाही म्हणून कांग्रेस प्रणित संचालकांनी पुढाकार घेऊन भाजप प्रणित डॉ विजय देवतळे यांच्यावर अविश्वास आणून सत्ता पालट करण्याचा प्लान आखला परंतु हा प्लान पूर्णतः फसला आणि बाजार समिती सभापती डॉ देवतळे यांच्यावरील अविश्वास ठराव हवेतच विरल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला तर पराजयाने विरोधकांचे तोंड मात्र पडले असल्याचे चित्र दिसलें.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर विजय देवतळे यांच्या कार्यप्रणालीवर असमाधान व्यक्त करत 12 संचालकांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता. या अविश्वास ठरावावर आज ५ मार्च रोजी विशेष सभा घेण्यात आली होती. अविश्वास आणणाऱ्या बारा संचालकांपैकी पांडुरंग सोनबा झाडे ह्या संचालकाला जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र असल्याने त्यांना दिलेली नोटीस रद्द ठरविली त्यामुळे विरोधकाकडे केवळ 11 च संचालक राहिले. अविश्वास ठराव पारित होण्यासाठी 12 संचालकांची आवश्यकता होती, विरोधकांजवळ पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे ते आज अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी आयोजित सभेला उपस्थित झाले मात्र सह्या न करता सभा ८ दिवसानंतर घेण्यात यावी असे अध्याशी अधिकारी तहसीलदार योगेश कौटकर यांना अर्ज देऊन मागणी केली, परंतु एकदा सभा ठरल्यावर सभा पुढे ढकलू शकत नाही व सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांना असून त्यांची मागणी फेटाळली, त्यामुळे कोणताही विषयाला सामोरे न जाता सभागृहातुन ते निघून गेले. सभेत सत्तारूढ गटाचे तीन संचालक उपस्थित होते त्यांनी सुद्धा डॉ. देवतळे यांचे वर विश्वास असल्याचे लेखी पत्र दिले तशी नोंद कारवाई बुकात करण्यात आली. सभा कोरम अभावी रद्द करण्यात आली व नियम २३ अ प्यारा ५ नुसार पुढील सहा महिने अविश्वास आणता येणार नाही असे नमूद करून अविश्वास फेटाळण्यात आला असल्याचे अध्याशी अधिकारी यांनी जाहीर केले.
देवदर्शन करून काय फायदा?
डॉ विजय देवतळे यांच्यावर अविश्वास आणणारे सदस्य म्हणून जयंत टेंमुर्डे, राजेंद्र चिकटे ,नितीन मते , हरीश जाधव ,दिनेश कष्टी ,गणेश चवले ,निरज गोठी, प्रवीण मालू ,कल्पना टोंगे ,अभिजीत पावडे ,पुरुषोत्तम पावडे ,पांडुरंग झाडे हे विरोधी गटाकडून उपस्थित होते. हे सर्व संचालक अविस्वासाच्या ठरवाआधी तीर्थयात्रेला गेले होते, त्यांनी येथ्येच्या देवदर्शन घेतले आणि अविश्वास ठराव पारित होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना पण केली, खरं तर ते स्वतःहून गेले नव्हते तर त्यांना पाठविण्यात आले होते आणि कुणालाही एकाला सत्तेत बसायच होतं म्हणून हा देवदर्शनाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित आणि प्रायोजित केला होता, पण देवाने त्यांचे जणू ऐकले नसावे आणि म्हणूनच त्यांना अविश्वास ठरावावर मत सुद्धा व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही याचा अर्थ यांना देवदर्शनाचा फायदा काय झाला याबद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहे,