चंद्रपूर शहरातील पोलिसांचा मर्डर झाला त्या पिंक पैराडाईज बार अॅण्ड रेस्टॉरेंटवर पोलीसांची मोठी कार्यवाही,
चंद्रपूर (अतुल दिघाडे ):-
चंद्रपूर शहरातील पिंक पैराडाईज बार अॅण्ड रेस्टॉरेंटवर पोलीस ठाणे चंद्रपूर शहर हद्दीतील अधिकाऱ्यांनी आज सकाळी मोठी कार्यवाही केली. हे बार आता शिलबंद केले असून पुढील सुनावणी पर्यन्त ते सुरु होणार नाही त्यामुळे या बार परिसरातील नागरिकांसाठी सुखद व महत्त्वाची बातमी ठरली आहे.
पिंक पैराडाईज बार अॅण्ड रेस्टॉरेंट या एफ.एल. 3 परवाना धारकाने आपल्या व्यवसायाच्या परिसरात निर्माण केलेल्या समस्यांमुळे त्यावर कारवाई करण्यात आली आहे. बार समोर बांधकाम साहित्य, रेती, गिट्टी, बल्ली आणि इतर अव्यवस्थित वस्तू ठेवण्यात आल्या होत्या, ज्यामुळे ग्राहकांसाठी पार्किंग व्यवस्था अनुपलब्ध झाली होती. त्यामुळे या बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या वाहणांची पार्किंग रोडवर होण्यास भाग पाडली होती. यामुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता, तसेच सामान्य नागरिकांना मार्गावर अवरोध होऊन त्यांना समस्यांचा सामना करावा लागला.
सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाहतुकीच्या कोंडीमुळे त्रास वाढला होता. यासोबतच, बारमध्ये झालेल्या झगड्यांमुळे एक गंभीर प्रकरण जन्म घेत होते, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि तातडीने कार्यवाहीची मागणी केली.
पोलीस प्रशासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार केला आणि आपल्या अधिकारांचा वापर करत बारमधील विकृती व अडचणी दूर करण्यासाठी कार्यवाही सुरू केली. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके व त्यांच्या स्टॉफने आज दि. 11/03/2025 रोजी पिंक पैराडाईज बार अॅण्ड रेस्टॉरेंट सिलबंद करण्यात आले.
ही कार्यवाही महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 142(2) अंतर्गत लोकहिताच्या दृष्टीने करण्यात आली. या कार्यवाहीच्या परिणामी बारच्या अनुज्ञप्तीधारक वैभव बनकर यांना पोलीस प्रशासनाने सूचना दिल्या असून, पोलीस स्टाफच्या उपस्थितीत बार सिल करण्यात आला.
या कार्यवाहीनंतर परिसरात शांतता व सुव्यवस्था परत येईल, असे अपेक्षित आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षा आणि सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.
सदर कार्यवाही पोलीस प्रशासनाच्या कठोर प्रयत्नांचे आणि नागरिकांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाचे प्रतीक ठरली आहे.