Home चंद्रपूर धक्कादायक :- भ्रष्टाचारी RTO मोरे आणि मेश्राम यांनी ठेवलेले सर्व एजंट ट्रान्सपोर्ट...

धक्कादायक :- भ्रष्टाचारी RTO मोरे आणि मेश्राम यांनी ठेवलेले सर्व एजंट ट्रान्सपोर्ट व शोरूम कर्मचारी?

RTO कार्यालयातील मुख्य एजन्ट (दलाल) अरुण टोगे यांनी रामनगर पोलीस स्टेशनं येथे दिलेले बयान आले समोर.

RTO चा पंचनामा भाग -9

जेव्हापासून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून किरण मोरे रुजू झाले आणि सहाय्यक प्रादेशिक अधिकारी म्हणून याचं कार्यालयात आंनद मेश्राम हे कार्यरत आहें तेंव्हापासून यांचं या कार्यालयात एजंट ठेऊन (दलाल) ठेऊन व त्यांच्या माध्यमातून कार्यालयीन फाईल्स फिरवून माल सुतो अभियान” जोरात सुरु आहें, मात्र एखाद्या पत्रकारांनी यांच्या या मालसुतो अभियानाची बातमी केली किंव्हा एखाद्या राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी यांनी वरिष्ठाकडे व एसीबी कडे तक्रार केली की लगेच यांचे माथे फिरतात आणि बातमी देणाऱ्या पत्रकारावर आणि तक्रार करणाऱ्या राजकीय सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यावर हे पोलिस अधिकाऱ्यांसोबत मिळून सेटिंग करतात व स्वतःच्या मालसुतो अभियानावर कुठंलाही आघात होऊ देत नाही असेच एकूण चित्र आहें, म्हणजे यांनी एजंट च्या माध्यमातून कोट्यावधीची अवैध वसुली करून भ्रष्टाचार करायचा आणि जर कुणी यामध्ये आडवे आले तर त्यांची पोलिसांत खंडणी मागते म्हणून तक्रार करून गेम करायचा हा नित्यक्रम भ्रष्टाचारी किरण मोरे व आनंद मेश्राम हे मागील चार वर्षांपासून करत आहें

RTO कर्यालयात चाललेल्या या अवैध वसुली व भ्रष्टाचाराची पोलखोल करणाऱ्या अशाच एका नयन साखरे नावाच्या एका राजकीय पदाधिकारी यांच्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती समोर आली आहें, त्याला खंडणी च्या गुन्ह्यात फसवून RTO किरण मोरे आणि आंनद मेश्राम यांनी गेम केला, नयन साखरे यांनी RTO कार्यालयात दलालामार्फत होतं असलेल्या अवैध वसुली चा एक व्हिडीओ काढला आणि कोण कुठे किती पैसे घेतात याची चित्रफीत तयार केली आणि त्यांनी या संदर्भात चालत असलेल्या भ्रष्टाचाराला उजागार करण्यासाठी RTO कार्यालयाला जे सिसिटीव्ही कैमेरे लावले होते त्यांचे व्हिडीओ फुटेच मागितले पण भ्रष्टचारात पूर्ण बुडालेले RTO कार्यालयाचे सिसिटीव्ही फुटेज बाहेर आले तर आपली पोल खुलेलं म्हणून नयन साखरे यांना पैशाची लालच देऊन त्यांच्यावर खंडणी मागितली म्हणून गुन्हे दाखल केले, हे प्रकरण 17/12/2021 मध्ये घडवले गेले व 18/12/2021 ला नयन साखरे याला बोलवून ट्रॅप मध्ये फसविण्यात आले, या प्रकरणात अजूनही निर्णय झाला नाही मात्र या प्रकरणी पोलिसांत साक्ष देतांना जे बयान नोंदवले गेले त्यात RTO च्या प्रमुख दलालापैकी एक दलाल अरुण टोगे याने जे बयान दिले ते ऐकून कुणालाही धक्काचं बसेल एवढी माहिती समोर आली आहें.

काय आहें RTO दलाल अरुण टोगे यांचे बयान?

नयन साखरे या राजकीय सामाजिक कार्यकर्ते यांना 35 हजाराची लालच देऊन खोट्या खंडणी च्या गुन्ह्यात फसविल्यानंतर या प्रकरणी दलाल अरुण टोगे यांचे 20/4/2022 ला बयान रामनगर पोलीस स्टेशनं येथे नोंदवले गेले त्यात त्यांनी म्हटले आहें की ” मी PUC सेंटर मध्ये काम करतो त्यामुळे मला नेहमी RTO कार्यालयात जावे लागते नयन साखरे हा खाजगी ट्रान्सपोर्ट व गाडी शोरूम मध्ये काम करणाऱ्या लोकांकडून नेहमी पैशाची मागणी करत होता त्यामुळे मी वरिष्ठाकडे अर्ज करत आहें, त्यांच्या बयानमध्ये नमूद आहें की त्यांचे सोबत रवी निवलकर, संजय नगराळे, राहुल नगराळे, देवा गोंगले, दिपक खाडीलकर, रमेश नळे, मनोज घडसे, हरिदास गणवीर, कुणाल नगराळे, पंकज रागीट व अतुल माळवे हे सोबत काम करतात, खरं तर वरील नमूद सर्व केवळ RTO कार्यालयात दलाल म्हणून काम करतात ते कुठल्याही ट्रान्सपोर्ट कपंनी किंव्हा गाड्यांच्या शोरूम मध्ये काम करत नाही हे सगळं खोटं असतांना देखील पोलिसांनी किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांच्या सांगण्यावरून नयन साखरे याच्यावर खंडणी चे गुन्हे दाखल केले.

RTO कार्यालयातील दलाल हे ट्रान्सपोर्ट आणि गाड्यांचे शोरूम कर्मचारी कसे?

RTO कार्यालयात प्रमुख दलाल अरुण टोगे म्हणतो की मी PUC केंद्रात काम करतो व माझ्यासोबत असलेले सोबती हे खाजगी ट्रान्सपोर्ट व गाड्यांच्या शोरूम मधले कर्मचारी आहोत तर मग या सर्वांचे वेतन तिथून होतं असेल त्यांचे पीएफ कंटत असेल पण हा सर्व बनवाबनवी चा खेळ RTO कर्यालयात सुरु असून तेलंगना सिमा नाका येथे जी एसीबी ची कार्यवाही झाली व त्यात सहाय्यक निरीक्षक शिवाजी विभुते यांच्यासह जो एजंट पकडल्या गेला त्यावरून RTO अधिकारी यांनी खाजगी एजंट पोसले आहें आणि त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची माया RTO अधिकारी जमा करतात आणि सर्वसामान्य माणसाच्या गाड्यावर जबरण दंड वसुली करून लोकप्रतिनिधी व मोठे पत्रकार यांना पैसे वाटतात यामुळे सामान्य माणसावर ते अन्याय करतात हा अन्याय दूर व्हावा आणि पारदर्शक पद्धतीने कारभार चालावा यासाठी हा RTO चा पंचनामा लिहिण्याचा प्रपंच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here