Home भद्रावती मनसेच्या पुढाकाराने प्रदीर्घ संघर्षानंतर दिलीप भोगेकर यांना मिळाली त्यांची हक्काची शेतजमीन.

मनसेच्या पुढाकाराने प्रदीर्घ संघर्षानंतर दिलीप भोगेकर यांना मिळाली त्यांची हक्काची शेतजमीन.

भद्रावती तालुक्यातील शेगाव खुर्द ची घटना, बेकायदेशीरपणे तब्बल 25 वर्ष शेतकऱ्यांच्या नावाने असलेल्या जमिनीवर होता इतरांचा कब्जा.

भद्रावती प्रतिनिधी:-

दिलीप भोगेकर यांच्या साधेपणाचा गैरफायदा घेऊन माझ्या मौजा शेगाव खुर्द येथील सर्व्हे क्रमांक 523/3 आराजी 2.21 या जागेवर वर्धा जिल्ह्यात राहणारे भोजराज दुधाराम भागडे यांनी केवळ ईसार पत्राच्या कागदावर तब्बल 25 वर्ष बेकायदेशीर कब्जा करून ती शेती इतरांना ठेक्याने देऊन लाखों रुपये कामावले परंतु ज्यांच्या नावाने ती शेतजमीन आहें त्याला दुसऱ्याकडे रोजीने जायची वेळ आली असल्याची तक्रार मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी या संदर्भात संपूर्ण अभ्यास करून शेतकऱ्यांची कैफियत ऐकली आणि त्यांनी स्थानिक शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार यादव यांना याबाबत सविस्तर माहिती दिली की ज्यांची शेती आहें व त्यांच्या नावाने सातबारे पण आहें तरीही वर्धा जिल्ह्यातील व्यक्ती जर त्या शेतीवर कब्जा करून ती शेती दुसऱ्याला किरायाने देतं असेल तर मग हा शेतकऱ्यावर अन्याय आहें आणि तो अन्याय दूर व्हावा यासाठी मनसे कार्यकर्ते व पिडीत शेतकरी दिलीप भोगेकर यांचे कुटुंबीय यांनी त्यांच्या हक्काच्या शेतात मागील 25 वर्षानंतर नागर फिरवला व त्यांनी आंनद साजरा केला, दरम्यान शेती किरायाने करणारे नन्नावरे यांनी शेतात कब्जा झाल्याचे अधोरेखित झालेले झेंडे काढले, मात्र स्थानिक शेगाव खुर्द चे सरपंच मोहित लभाने यांनी मध्यस्थी करून तो प्रश्न सोडवीला असल्याची माहिती आहें.

मौजा शेगाव खुर्द येथे सर्व्हे क्रमांक 523/3 आराजी 2.21 ही शेती दिलीप भोगेकर यांची असून त्यांच्या वडिलांचा साधेपणाचा गैरफायदा घेऊन भोजराज दुधाराम भागडे राहणार झाडगाव ता. जिल्हा वर्धा यांनी कब्जा करून काही बोगस कागदाद्वारे व भोगेकर कुटुंबाला ठार मारतो ही भीती दाखवून कब्जा केला होता, अतिशय चलाख असणाऱ्या भोजराज दुधाराम भागडे यांनी वेळोवेळी पोलीस स्टेशन येथे आपले आर्थिक साठेलोटे करून मूळ मालक भोगेकर यांना शेती करण्यास मनाई केली होती, वेळोवेळी गोगोड बोलून व मानलं नाही तर ठार मारण्याची धमकी देऊन तब्बल 25 वर्षांपासून लाखों रुपयाचे उत्पन्न त्यांनी मिळविले व ज्याची शेती आहें त्यांना काहीच मिळत नव्हते, त्यामुळे मनसेकडे आलेल्या तक्रारीमुळे व खुद्द शेतात भोगेकर कुटुंबासोबत मनसे कार्यकर्ते जाऊन जमिनीला नांगरून स्वतः तिथे हक्क मिळवीला, या संदर्भात ठाणेदार यादव यांनी सत्त्याची बाजू ऐकून गरीब शेतकरी दिलीप भोगेकर यांना न्याय मिळवून दिला त्याबद्दल पिडीत शेतकरी कुटुंबियांने ठाणेदार यादव व त्यांच्या अधीनस्त पोलीस कर्मचारी यांचे आभार मानले. दरम्यान उद्या गुरुवारला याबाबत शेवटचा निर्णय ठाणेदार यादव हे घेणार असल्याने त्यांच्या निर्णयाची भोगेकर कुटुंब वाट पाहत आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here