Home भद्रावती सनसनीखेज :- तहसीलदार राजेश भांडारकर यांचे मार्गदर्शनात चंदखेडा येथी रेती साठा जप्त.

सनसनीखेज :- तहसीलदार राजेश भांडारकर यांचे मार्गदर्शनात चंदखेडा येथी रेती साठा जप्त.

कांग्रेस कार्यकर्ते प्रमोद मगरे यांचा अवैध रेती साठा असल्याची प्राथमिक माहिती,

राजकीय दबावाला तहसीलदार बळी पडणार नसल्याने दंडात्मक कारवाई होणार?

भद्रावती प्रतिनिधी:-

वरोरा भद्रावती तालुक्यात कांग्रेस कार्यकर्ते प्रमोद मगरे यांचे रस्ते व बंधारे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु असून त्या बांधकामाला पुरवठा करणारी रेती ही अवैध मार्गाने येत असल्याने त्यांचा जागोजागी रेती साठा मोठ्या प्रमाणात केल्या जातं आहे, अशातच चंदनखेडा शिवारात त्यांचा रेती साठा असल्याची माहिती मिळताच तहसीलदार राजेश भांडारकर यांचे नेतृत्वात गौण खनिज पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी सदर रेती साठा जप्त करून मोठी कारवाई केल्याने व तहसीलदार तहसीलदार राजेश भांडारकर हे कुठलाही राजकीय दबावाला बळी पडत नसल्याने या क्षेत्रात अवैध रेती साठा करणाऱ्याचे धाबे दणाणले आहें.

तहसीलदार राजेश भांडारकर यांचे नेतृत्वात आज दिनांक 20/4/2025 रोजी सकाळी 5:55 वाजता मौजा चंदनखेडा येथे एम, एस, ई, बी, कार्यालय जवळ बंधाऱ्याचे काम सुरू आहे त्या ठिकाणी अवैद्य रेतीच्या साठा आढळून आल्याने गौण खनिज पथकांनी सदर रेतीसाठा ची तपासणी केली असता स्थानिक ठिकाणी टी, पी, आढळून आलेली नाही मोका तपासणी केली असता तेथील मजुरांनी सांगितले सदर रेती साठा हा कांग्रेसच्या नेत्यांच्या समर्थकांचा (प्रमोद मगरे) असल्याचे माहिती दिली आहे. सदर रेतीसाठा पंचनामा करून पोलीस पाटील समीर खान पठाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले, सदरची कारवाई गौण खनिज पथक नायब तहसीलदार सुधीर खांडरे, मंडळ अधिकारी दडमल व तलाठी तलहार व तलाठी मैदमवार यांनी केली.

जेसीबी पण जप्त होणार का?

तहसीलदार तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या पथकांनी रेती साठा जप्त केला असला तरी त्या ठिकाणी असलेली जेसीबी मशीन मात्र जप्त करण्यात आली नसल्याची माहिती आहें, खरं तर कुठेही रेती उत्खनन व गौण खनीज उत्खनन होतं असेल व त्या ठिकाणी जर पोकलेनं किंव्हा जेसीबी मशीन असेल तर त्या मशीन ची पण जप्ती होतं असतें परंतु हा रेती साठा ज्या ठिकाणी  आहें त्या ठिकाणी  जेसीबी मशीन असल्याने ती मशीन जप्त व्हायला हवे अशी मागणी होतं आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here