Home चंद्रपूर धक्कादायक :- उसगाव येथील हिंद महमिनरल (गुप्ता कोल वाशरी) कंपनीत एका सिक्योरिटी...

धक्कादायक :- उसगाव येथील हिंद महमिनरल (गुप्ता कोल वाशरी) कंपनीत एका सिक्योरिटी गार्ड चा आकास्मिक मृत्यू.

कंपनी व्यवस्थापनाच्या सुरक्षा नियोजन अभावी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने सुरक्षा गार्डचा मृत्यू. स्थानिक उसगाव गावकरी कंपनीत धडकले.

चंद्रपूर:-

घुग्गुस क्षेत्रातील उसगाव येथील हिंद महामिनरल कंपनी (गुप्ता कोल वाशरीचे) चे नविनीकरण होतं असतांना तिथे काम करणाऱ्यांना सुरक्षा गार्ड व कामगारांना सुरक्षा साधने व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने उन्हात पाणी मिळतं नसल्याने उन्हात तिथे काम करणाऱ्यां कामगारांना जणू वाऱ्यावर सोडले की काय असा प्रश्न पडला असून काल सायंकाळी तिथे या परिसरातील वाशरी मध्ये तैनात सिक्योरिटी गार्ड विजय माहुरे (40 वर्ष, निवासी भोयगांव) चा काल मृत्यु झाला आहें, दरम्यान सायंकाळी 6:30 वाजता झालेल्या सिक्योरिटी गार्ड विजय माहुरे यांच्या मृत्यची पुष्टी घुग्घुसच्या एका खाजगी डॉक्टर ने सायंकाळी 7 वाजता केली.पोलीस प्रशासनाने याबाबत मध्यस्ती केली मात्र कंपनी व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याने रात्री उसगाव वाशियांनी कंपनी गेट समोर मृतदेह आणून ठेवला होता.

या दरम्यान मृतकच्या नातेवाईकांनी रात्री 9:30 वाजेपर्यंत रुग्णालयासमोर असलेल्या मृतक बॉडी ला हलविण्यात नातेवाईकांनी मनाई केली होती. मात्र काही सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांच्या मध्यस्थीने तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान घटनास्थळी घुग्घुस पोलीस पोहचली व  स्थिती नियंत्रणात आणली आहें. दरम्यान जोपर्यंत मृतकांच्या परिवाराला नुकसान भरपाई मिळतं नाही तोपर्यंत मृतदेह घरी नेणार नाही असा अट्टाहास मृतकांच्या नातेवाईकांनी करून प्रेत कंपनी गेट जवळ आणले होते मात्र रात्री उशिरा याबाबत निर्णय झाल्याची माहिती आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here