महाराष्ट्र धर्म व मराठी भाषेसाठी उद्धव- राज एकत्र यावं ही जनभावना, पण उद्धव ठाकरे प्रामाणिक राहणार का? यावर प्रश्नचिन्ह.
लक्षवेधी :-
महाराष्ट्र राज्याच्या अस्मितेसाठी, मराठी भाषेच्या संवर्धणासाठी व मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना-मनसे युती व्हावी आणि राज ठाकरे -उद्धव ठाकरे एकत्र यावे ही तमाम मराठी माणसाची भावना आहें, पण मनाने दिलदार असणारे राज ठाकरे यांच्या सोबत कुटील डाव खेळणारे व सत्तेसाठी वाट्टेल ती तडजोड करणारे उद्धव ठाकरे हे मनापासून एकत्र येणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित होतं आहें, कारण जेंव्हा उद्धव ठाकरे सोबत सन 2014 ला भाजप ने युती तोडली त्यावेळी राज ठाकरे यांना फोन करून त्यांनी युतीची साद दिली खरी पण मनसेला भाजप ने सोबत घेऊ नये म्हणून नामांकन फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मनसेला युतीच्या जाळ्यात अडकून ठेऊन उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दगा दिला, तो दिवस अजूनही मनसे नेते बाळा नांदगावकर विसरले नाही, एवढेच नव्हे तर बाळा नांदगावकर यांनी अनेक वेळा शिवसेनेसोबत मनसेची युती व्हावी यासाठी प्रयत्न केले परंतु सतत्तेसाठी हपापलेले उद्धव ठाकरे यांनी मात्र गह दिला नाही, दरम्यान महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी पुन्हा शिवसेनेसोबत एकत्र येण्यास हरकत नाही, कारण महाराष्ट्रापेक्षा आमचे वाद हे फार शुल्लक आहें असे ते म्हणाले, त्यावर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी एकत्र यायला मी सुद्धा तयार आहें असे म्हटले परंतु त्यांनी अटी पण घातल्या की भाजप सोबत कुठलेही संबंध ठेऊ नये, पण जर एकत्र यायचं आहें तर मग अटी शर्ती कशासाठी? जिथे महाराष्ट्राचा विचार आहें तिथे उद्धव ठाकरे अटी शर्ती समोर करत असेल तर मग एकत्र येण्याला काय अर्थ आहें? असे मत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना व्यक्त केले.
शिवसेना सोडून आपला स्वतंत्र पक्ष स्थापन करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे खरे तर शिवसेनेचे अनेक आमदार खासदार संपर्कात असतांना सुद्धा त्यांना सोबत न घेता स्वतःच्या बळावर विस्थापित कार्यकर्त्यांना घेऊन पक्ष तयार केला, बरं ते बाहेर पडताना लपून छपून बाहेर पडले नाही तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगून ते बाहेर पडले आणि अगदी तीन वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 13 आमदार निवडून आणून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली, महत्वाची बाब म्हणजे सन 2009 च्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी बाळासाहेब सक्रिय राजकारणात असतांना मुंबई शहरात मनसेचे तब्बल 6 आमदार निवडणून आले तर शिवसेनेला केवळ 4 जागावर समाधान मानावे लागले होते, याचा अर्थ मुंबईत शिवसेनपेक्षा मनसेची ताकत मोठी झाली होती हे मान्य करावं लागेल.
काय आहें तो 2014 चा निवडणूकीतील प्रसंग?
सन 2014 च्या निवडणुकीत भाजप शिवसेना युती तुटली होती व त्यामुळे हतबल झालेले उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांची आठवण झाली, तेंव्हा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करून भाजप नेत्यांनी त्यांच्या सोबत कसा दगाफटका केला हे सांगून आपण दोघे एकत्र यावं असा संकेत दिला होता, त्यावर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटलं होतं की मग पुढ काय करायचं तर माझ्याकडील दोघे आणि तुझ्याकडील दोघे नेते चर्चा करतील आणि जागा ठरवतील असे म्हटले होते, त्यामुळे मनसे कडून बाळा नांदगावकर यांनी धुरा सांभाळली पण आज उद्या म्हणता म्हणता निवडणूकीचा नामांकन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख यायच्या आदल्या दिवसा पर्यंत उद्धव ठाकरे गोटातून कुठंलाही फोन उचलला गेला नाही, त्यामुळे आपल्या उमेदवारांचा एबी फॉर्म रोखून धरल्यानंतर मनसेने आपल्या उमेदवारांना शेवटच्या दिवशी एबी फॉर्म दिला आणि निवडणूक लढवली, त्यात शिवसेनेने भाजप ने शिवसेने सोबत केलेली गद्दारी आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील जनतेला भावनिक आव्हान करणाऱ्या क्लिप ऐकवल्या आणि भावनिक वातावरण निर्माण करून तब्बल 66 आमदार निवडून आणले, खरं तर त्यावेळी मनसे सोबत शिवसेनेने युती केली असती तर महाराष्ट्रात शिवसेना मनसेची सत्ता आली असती पण त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी जी खेळी केली ती अत्यंत जिव्हारी लागणारी होती,
शिवसेनेचा तो काय आहें कुटील डाव?
सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मनसेचे विद्यमान 12 आमदार होते तर राज्यातील अनेक मतदार संघात पक्षाला सक्षम उमेदवार होते त्यामुळे शिवसेना मनसे युती झाली असती तर निश्चितपणे मनसेचे किमान 30 ते 40 आमदार निवडून आले असतें, परंतु उद्धव ठाकरे यांच्या सल्लागारांनी वेगळी रणणिती आखाली आणि त्या विधानसभा निवडणुकीत मनसे भाजप युती होऊ नये हा कुटील डाव खेळून नामांकन फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मनसेला ताटकळत ठेवले आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने त्यांनी भावनिक साद घालून मते मागितली, बाळासाहेवावर प्रेम करणाऱ्यांनी भरभरून शिवसेनेला मतदान दिले त्याचा फटका मनसेला बसला आणि मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला, खरं तर भाजप ने युती तोडून शिवसेने सोबत दगाफटका केला असतांना भाजप सोबत शिवसेनेने जाऊ नये असा सर्वत्र सूर उमटला परंतु पण सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केलेल्या भाजप सोबत हातमिळवनी केली आणि सरकार मध्ये सहभाग नोंदवला, पण त्यात मनसेला मात्र मोठं नुकसान झालं त्यासाठी शिवसेना जबाबदार आहें, कारण शिवसेनेने ज्या मोठ्या प्रमाणात जागा मागितल्या त्या दिल्या नाही म्हणून युती तुटली, मात्र त्यावेळी भाजप सोबत मनसेची युती झाली असती तर कदाचित शिवसेनेला 66 जागा मिळाल्या नसत्या व मनसेला भाजप युतीत किमान 20- 25 जागा मिळाल्या असत्या, त्यामुळे शिवसेनेच्या कुटील डावामुळे मनसेला राजकीय अपयश आलं ही वस्तुस्थिती आहें. अर्थात पुन्हा उद्धव ठाकरे हे राज ठाकरे सोबत दगा फटका करणार नाही याची शास्वती कुणी घेऊ शकत नाही.