Home मुंबई संतापजनक :- अखेर महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला फासला हडताळ.

संतापजनक :- अखेर महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला फासला हडताळ.

निवडणूक काळात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा करू म्हणणारे फडणवीस आर्थिक शिस्तीत, तर मुनगंटीवार मात्र शेतकरी कर्जमाफी विषयी आक्रमक.

मुंबई न्यूज वार्ता :-

राज्याचा अर्थसंकल्प काल विधीमंडळात सादर करण्यात आला आहे. राज्यातील नवीन सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा अक्षरश:पाऊस पाडण्यात आला आहे. परंतु पुन्हा सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने दिले होते. याबद्दलची घोषणा अर्थसंकल्पातून होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. पण, अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफिचा क सुद्धा उच्चारला नाही. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी अगोदरचं विधिमंडळात केली होती त्यामुळे हे राज्य सरकार कर्जमाफी करेल असं वाटतं असतांना सरकारने हात झटकले, मात्र आपण शेतकरी कर्जमाफी चा विषय आकडेवारीसहित मी अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना मांडणार असल्याचे मुनगंटीवार यांनी प्रसारामाध्यमाना दिलेल्या प्रतिक्रियेतून सांगितले,

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे थकीत पैसे आणि धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करून सरकारने निवडणूकीच्या जाहिरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले ते पाळावे असे आवाहन करून त्यांनी या संदर्भात “रघुकूल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन ना जाई” हा उद् घोष करून त्यांनी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे असं मत व्यक्त करून सरकारला घेरले,पण मुळात या सरकारच्या नितिमत्तेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उभं राहिलं ते आता स्पष्ट झालं आहें, दरम्यान अर्थसंकल्पावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले “आजही माझी मागणी आहे आणि मी अर्थसंकल्पावर बोलताना आकडेवारीसहित हा मुद्दा पुन्हा मांडणार आहे. कदाचित हा मुद्दा राहिला असेल, पण, हा मुद्दा राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या दृष्टीने उत्पन्न वाढवण्याच्या स्रोतांबद्दलही मी चर्चा करणार आहे. पण, शेतकऱ्यांना मात्र या दृष्टीने कर्जमुक्ती देण्याचा विचार सरकारने करावा, ही विनंती मी विधानसभेत निश्चित करणार आहे”,

अर्थसंकल्प अधिकाऱ्यांचा असू नये, मुनगंटीवारांचा सरकारला घरचा अहेर

अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प मांडताना आर्थिक शिस्त पाळून हा अर्थसंकल्प मांडला असे म्हणाले पण त्यावर मुंगनटीवार म्हणाले की प्रश्न शिस्त लावणे किंवा लोकप्रिय घोषणांचा नाहीये. आपण जो राज्याच्या प्रगतीचा विभिन्न क्षेत्रामध्ये एक आराखडा तयार करतो. त्यानुरुप असलेल्या संसाधनांचा महत्तम उपयोग करणे म्हणजे अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प हा जनतेच्या प्रतिनिधींचा असावा. हा अधिकाऱ्यांचा असता कामा नये, याची काळजी घ्यावी लागते”, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतःच्या सरकारला घरचा अहेर दिला.

ते पुढे म्हणाले की आम्ही लोकांमध्ये जातो. लोकांच्या समस्या ऐकतो. ते प्रश्न अर्थसंकल्पातून कसे सोडवायचे? ते सोडवताना त्या दृष्टीने आपण विविध तरतुदी कशा करायच्या, याचा विचार अर्थसंकल्पात करतो”, दरम्यान माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना हा अर्थसंकल्प पटला नाही आणि त्यांनी ज्या पोटतीकडीने शेतकरी कर्जमाफीचा विषय लावून धरला त्यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी साधे भाष्य केले नाही, त्यामुळे परत मुनगंटीवार हे अर्थसंकल्पावर बोलताना सरकारला पुन्हा धारेवर धरेल असे संकेत मिळतं आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here