शाकीर च्या डिझेल गोडाऊन ला लागली आग तर रहीम च्या वर पोलीस मेहरबान?
चंद्रपूर / पडोली :-
मागील अनेक वर्षांपासून पडोली ताडाळी परिसरात शाकीर नावाचा शातीर व्यक्ती डिझेल ची अवैध खरेदी विक्री पोलिसांच्या संरक्षणात करत होता व तो एकदा म्हणाला होता की “बडे साहब मेरे खास हॆ फिर डर कायका.”म्हणजेच पोलीस अधिकारी माझ्यासोबत आहें तर भीती कशाची आणि त्याने आपलं सम्राज्य उभं केलं व डिझेलचं गोडाऊन तयार केलं, मात्र चोरीच्या माध्यमातून तयार केलेलं सम्राज्य गोडाऊन ला लागलेल्या आगीत होळपळून खाक झालं आणि शाकीर वर गुन्हे सुद्धा दाखल झाले अशाच एका रहीम ने डिझेल च्या खरेदी विक्रीसोबतच सट्टापट्टी व्यवसाय थाटला असून स्थानिक पोलिसांच्या मेहरबानी मुळे तो दररोज लाखोची उलाढाल करत असल्याची माहिती आहें.
रहीम नावाच्या व्यक्तीने अवैध डिझेल विक्रीतून कोट्यावधी ची माया जमवली असून यांची पडोली शहराच्या माध्यभागी डिझेल चे गोडाऊन आहें जर तिथे आग लागली तर अख्या पडोली शहराला आगीच्या झपाट्यात भस्म होतांना वेळ लागणार नाही अशी भयंकर परिस्थिती उद्भवू शकते, दरम्यान या रहीम च्या मागे एक किशोर नावाचा पोलीस कर्मचारी सहभागी असल्याची माहिती सुद्धा समोर येत असल्याने रहीम ची डिझेल खरेदी विक्री यासंह सट्टापट्टी पोलिसांच्या लक्षात येत नसेल तर नवलंच दरम्यान याबाबत पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर शाकीर च्या गोडाऊन आगीपेक्षा मोठी आग लागू शकते अशी भयावह परिस्थिती दिसत आहें.
रहीमवर पोलीस प्रशासनाची नजर जातं नाही असे नाही पण एक पोलीस त्याच्या सट्टापट्टीच्या धंद्यात पार्टनर असल्याची धक्कादायक चर्चा असल्याने अवैध धंद्याना बळ देणाऱ्या पोलीस प्रशासनावर पोलीस अधीक्षक कारवाई करतील कां? व रहीम च्या सट्टापट्टी आणि अवैध डिझेल चोरीवर वचक निर्माण करतील कां? हा प्रश्न जनतेला पडलेला आहें.