अपंग वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू तर कार मध्ये बसलेले तिघे ग्रामीण रुग्णालयातून फरार?
हिंगणघाट प्रतिनिधी :-
शहरातील अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयासमोर 75 वर्षीय विकलांग सावित्रीवाई राजबाबू तिवारी हीअपंग महिला आपल्या संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तहसील कार्यालयात कुबड्या घेत रस्त्याने आली असता त्या रस्त्याने भरधाव वेगाने आलेल्या कार ने जोरदार धडक देऊन तिला उडवले त्यात त्या वृद्ध महिला गंभीर जखमी झाली, दरम्यान त्या कार मध्ये बसलेल्या तिघांनी पळ काढण्याचा प्रयत्न करताच उपस्थित काही लोकांनी त्यांना अडवले आणि त्या वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल करण्याचा आग्रह धरला त्यामुळे नाईलाजास्तव त्या तिघांनी त्या वृद्ध महिलेला सरकारी रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, दरम्यान स्वतःची नावे रजिस्ट्रर मध्ये नोंद करून आम्ही पोलीस स्टेशन मध्ये सरेंडर होतो असे सांगून तिघांनी तिथून पळ काढला, चौकशीत ही गाडी माजी खासदार सुरेश वाघमारे यांच्या पत्नीचा नावे असल्याची माहिती असून फरार झालेले अल्लीपूर चे अमोल साखरकर, प्रदीप खत्री व अमोल खोडे हे त्या कार मध्ये होते ते माजी खासदार सुरेश वाघमारे यांचे नातेवाईक असल्याची माहिती आहें.
तहसील कार्यालयात वर्दळीच्या ठिकाणी असा अपघात व्हावा आणि तो सुद्धा एका विकलांगमहिलेचा हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असून राजकीय वर्दहस्त असल्याने ट्रॅफिक च्या नियमाचे उल्लंघन करून निरापराध अपंग बेसहारा वृद्ध महिलेचा असा बळी घेतला जावा याचा निषेध करावा तितका कमीच आहें, पण मृतदेह रुग्णालयात सोडून एका माजी खासदार यांच्या नातेवाईकांनी असे फरार व्हावे हे समाज मनाला वेदना देणारे आहें, कारण अपघात झाल्यानंतर हा प्रसंग माजी खासदार सुरेश वाघमारे यांना तर नक्की माहीत झाला असावा पण त्यानंतर सुद्धा कुणी त्या वृद्ध महिलेच्या मृत्यू ची दखल घेतली नाही हे त्याहुन संताप आणणारे आहें.
नातेवाईकांची काय आहें मागणी?
हिंगणघाट मधील ही पहिलीच घटना असावी ज्यात वृद्ध महिलेला अशी कार ची धडक बसली असावी, दरम्यान समाज माध्यमावर याबाबत अतिशय संतापजनक प्रतिक्रिया येत असून मृत वृद्ध महिलेच्या नातेवाईकांनी आता पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली असल्याची माहिती आहें, दरम्यान ते तीन फरार आरोपीना पकडून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व वृद्ध महिलेच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतं आहें.