Home भद्रावती क्राईम डायरी :- भद्रावती पोलिसांच्या आशीर्वादाने दारूकिंग नागो सह इतर दारू विक्रेते...

क्राईम डायरी :- भद्रावती पोलिसांच्या आशीर्वादाने दारूकिंग नागो सह इतर दारू विक्रेते आले जोमात? पोलीस कुठे गेले, कोमात ?

दारूकिंग नागो नागपुरे यांच्या लाखोंच्या अवैध दारू विक्रीचे राज कधी उलगडणार ?

भद्रावती प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असली तरी ती केवळ नावालाच असून प्रत्यक्ष खुलेआम अवैध दारू विक्रीचे दुकान पोलिसांच्या मदतीने सर्वत्र सुरू आहे. भद्रावती येथे तर स्वतःला ठाणेदारापेक्षा कमी न समजणाऱ्या भीमराव पडोळे सारख्या पोलिसांमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांना जणू पाठबळ मिळत आहे. अशातच किल्ला वार्ड परिसरात मागील अनेक वर्षापासून सोडा फैक्टरीच्या नावाखाली कुठलीही फैक्टरी करिता परवानगी न घेता जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नागो नागपुरे यांनी पोलिस प्रशासनाशी अर्थपूर्ण संगनमत करून व मागील पाच वर्षात अवैध दारूच्या व्यवसायातून कोट्यावधी रुपयाची उलाढाल केल्याची माहिती आहे.
दारूकिंग नागो यांच्यासह आता इतर अवैध दारू विक्रेते सुद्धा जोमात आले असल्याचे भयावह चित्र बघावयास मिळत असून भद्रावती शहरात अनेक अवैध दारू विक्रेत्यांनी आपापले झोन वाटून घेवून मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री चालवलेली आहे. यामधे झिंगुजी वार्ड बालाजी सभागृह जवळ, मठा च्या मागे , आम्बेडकर वार्ड, प्रवीण मोबाइल शॉप जवळ , अन्ना पूरी भाजी जवळ, एच पी पेट्रोल पंप गवराळा चोक , मंदा पान सेंटर पुराना कोर्ट , शिवाजी नगर तलावा समोर , विजासन, चोक, बंगाली कैंप, फुकट नगर , जुना सुमठाणा. पुराना बस स्टैंड नगर परिषद चा मागे ढोके पान सेंटर चा सामोर , भंगाराम वार्ड, व इतर ठिकाणी अवैध दारू विक्री जोमात सुरू असून पोलिस मात्र हप्ते वसुली करून कोमात गेले की काय ? अशीच परिस्थिती दिसत आहे. आता ठाणेदार पवार या संदर्भात नव्याने काय पाऊल उचलतील याकडे भद्रावती शहरातील जनतेचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here