Home चंद्रपूर मनसे नंतर माजी खा. पुगलीया यांची कोळसा चोरी प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी.

मनसे नंतर माजी खा. पुगलीया यांची कोळसा चोरी प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी.

राज्य शासनाच्या कोट्यावधी रुपयाच्या रॉयल्टी ची सुद्धा चोरी.

चंद्रपूर प्रतिनिधी -:

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्टिम कोळशाची चोरी कोळसा व्यापारी खाजगी विमला रेल्वे सायडिंग व वणी तालुक्यातील राजूर रेल्वे सायडिंगच्या संचालकांसोबत मिळून करीत आहे व पॉवर प्लांट ला जाणाऱ्या कोळशामधे पॉवर प्लांट ची राख आयर्न कंपन्याचे वेस्टेज मटेरियल व कोल वॉशरिज चा रिजेक्टेड कोळसा मिसळून रेल्वे द्वारे पाठवला जातो त्यामधे दररोज कोट्यावधी रुपयाची कोळशाची चोरी होतं असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी सदर प्रकरणी सीबीआय द्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सदर मागणी काही दिवसापूर्वी मनसेने केली असताना आता चंद्रपूर चे माजी खासदार नरेश पुगलीया यांनी सुद्धा जिल्ह्यातील स्टीम कोळशाची होतं असलेली चोरी प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून कोळसा चुरी ऐवजी स्टील कोळसा वेकोली मधून नेल्या जात असल्याने एक प्रकारे रॉयल्टी ची चोरी होतं आहे त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी व राज्याचा जो रॉयल्टी चा पैसा कोळसा माफिया व संबंधित वेकोली अधिकारी संगनमत करून बुडवतात त्यांच्यावर कारवाई करवून अशी मागणी केली आहे.

माजी खासदार नरेश पुगलीया यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देतांना सांगितले की चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्हयात कोळशा सोबतच लाईम स्टोन ही मोठया प्रमाणात असल्यामुळे महाराष्ट्र शासनाला एकटया चंद्रपूर जिल्हयातून सन 2020-2021 मध्ये 492.74 करोड रूपये मायनिंग रॉयल्टी मिळाली असुन त्यातून 30 टक्के रक्कम चंद्रपूर जिल्हयाच्या विकासा करीता मिळाली आहे ( 147.82 करोड़ रूपये) तसेच याच वर्षात लाईम स्टोनचा मायनिंग रॉयल्टी व्दारे 84.80 करोड रूपये खनिज निधीतून मिळाले असून त्याचा 30 टक्के भाग (25.44 करोड रूपये) चंद्रपूर जिल्हयाच्या विकासा साठी मिळाला आहे.

पंरतु दुर्देवाने W.C.L (वेकोली ) मध्ये कोळशाचा मोठया प्रमाणात भ्रष्ट्राचार होत असून यामध्ये जिल्हयातील कोल माफीया मागील काही वर्षा पासून सक्रीय झाले आहेत. बंदूकीच्या व तलवारीच्या धाकावर चंद्रपूर जिल्हयात वेकोलीच्या पाच यरिया मध्ये अनेक खदानी असून या खदानीतील 30 ते 35 टक्के चांगला कोळसा (स्टिम कोल ) हे कोल माफीया दादागिरीच्या भरोशावर धनबाद स्टॉईलने हजारो टन कोळशाची अफरातफर दर दिवशी करत आहे. आणि याला राजकिय पाठबळ मिळाल्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे परंतु यामुळे राज्य सरकारचे शेकडो कोटींचे मायनिंग रॉयल्टीचे नुकसान होत आहे. मोठया प्रमाणात कोळशाची चोरी स्लॅग कोल (चुरी ) च्या नावावर चांगल्या कोळशाची वेकोलीच्या खदानीतून रोज हेराफेरी करण्यात येत आहे.

या संदर्भात ते म्हणाले की नुकतेंच 18 जानेवारी 2022 रोजी चे देता येइल पुथ्वी जगंम नावाच्या व्यक्ती कडे स्टिम कोल चा डीओ असतांना व त्याच्या परमिट चा शेवटचा दिवस असतांना त्याला कोळसा न देता एका रामदेव बाबा ट्रान्सपोर्ट कंपणीच्या मालका कडे स्लॅग कोल चा डीओ असतांना त्याच्या त्याचा तिन ट्रक मध्ये स्लॅग कोल न भरता स्टिम कोल ( चांगल्या दर्जाच्या कोळशाचे) भरण्यात आले. चांगला कोळसा भरून जात असतांना हे तिन्ही ट्रक नांदगावातील काही जागरूक युवकानी पकडून दिले पोलीस तक्रार करण्यात आली. प्रिन्ट मिडिया व ईलेक्टॉन्क्सि मिडियाचे वार्ताहर व पोलिस अधिकारी हे सगळे तिथे घटना स्थळी उपस्थित झाल्यानंतर स्लॅग कोल भरले नसून स्टिम कोल भरले आहे. हे सर्वा समक्ष सिध्द झाले असतांना सुध्दा सि.जि.एम (मुख्य महाप्रबंधक) व त्याचे इतर सहकाऱ्यांनी कुठलीही कारवाई केली नाही त्या भागातील पालास स्टेशन इन्चार्ज या प्रकरणी जनतच्या तक्रारावर गुन्हा नोंदवित नाही कारण ते म्हणातात की वेकोली हे या कोळशाचे मालक असल्याने त्यांनी तक्रार केल्यासच आम्ही गुन्हा नोंद करू.त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सि.बि आय मार्फत करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here