Home चंद्रपूर खळबळजनक :- महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर क्षेत्रात उभे 50 वर्ष जुनी झाडे...

खळबळजनक :- महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर क्षेत्रात उभे 50 वर्ष जुनी झाडे जाळली.

मुख्य अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा:- राजेश बेले यांची मागणी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

अगोदरच चंद्रपूर जिल्हा उन्हाळ्यात तापात असतांना येथील झाडेच खऱ्या अर्थाने येथील जनतेला यापासून बचाव करू शकतात पण इथे तर झाडांचीच कत्तल होऊन काही झाडे उभी जाळली जातं असल्याचा खळबळजनक प्रकार चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात उघडकीस आला आहे. या संदर्भात संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी वनविभागात तक्रार करून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता कोमलवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या क्षेत्रात पाईपलाईन जवळील हजार मीटर क्षेत्रातील वृक्षाची वयोमर्यादा 50 वर्षा पेक्षा जास्त असलेली जवळपास 100 वृक्षा पेक्षा जास्त वृक्ष उभे जाळले या वृक्षाला जाळल्यामुळे सी एस टी पी एस वारंवार घातक वायू सोडून प्रदूषण करीत आहे त्यावर आळा बसवणे कठीण झाले आहे. तरीसुद्धा अशा प्रकारचे वृक्ष जाडून नागरिकांना मिळणारं प्राणवायू नष्ट करण्याचे पातक सीएसटीपीएसचे मुख्य अभियंता करीत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतं आहे.

या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर वन विभाग यांना लेखी तक्रार दिल्यानंतर मोका पाहणी करिता वन अधिकारी वन सहाय्यक धीरज देगावकर यांनी मोका चौकशी केल्यानंतर त्यांच्या निदर्शनात चंद्रपूर माऔष्णिक विद्युत केंद्रांनी हजार मीटर परिसरात लागलेले वृक्ष आंबा चिंच कडुलिंब इतर प्रकारच्या वृक्षांना जाळल्याचे निदर्शनात आले, दरम्यान यापूर्वी पण संजीवनीपर्यावरण सामाजिक संस्थापर्यावरण सामाजिक संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी वृक्ष कटाईची वारंवार तक्रार वन विभागाला दिलेलीी होती त्यावेळी पण मुख्य अभियंता यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा म्हणून वन विभागाला मागणी केलेली होती अशा प्रकारचे वारंवार वृक्षांची कत्तल करून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या सीएसटीपीएससीचे मुख्य अभियंता व इधर इधर अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजेश बेले यांनी दिला आहे.

Previous articleशैक्षणिक :- 10 वी शिक्षणानंतर विद्यार्थ्यांनी हे कोर्स केल्यास आयुष्य बदलेल ? 
Next articleचंद्रपूर वनी-आर्णी लोकसभा पोटनिवडणुक होणार ? निवडणूक आयोगाचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here