Home चंद्रपूर नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित...

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्याला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त

आयोजित शेतकरी मेळाव्याला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर

केंद्राची निर्यात बंदी, शेतमालाला भाव नाही, हमीभाव नाही, वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक, खते, बियाणे, शेती अवजारे यांचे वाढलेले दर, महागाईचा उच्चांक, जलयुक्त शिवारचे अपयश, चारा उपलब्ध न करणे, परिणामी पशुधनाची गैरसोय, केंद्राकडून मदत न मिळणे, शेतीसाठी असणाऱ्या सामुग्रीवर भरमसाठ जीएसटी आकारणे या सरकारी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्थ झाला आहे.
अश्या कठीण परिस्थिती शेतकऱ्यांशी संवाद साधून विचारपूस आणि चर्चा आज शेतकरी मेळाव्यात झाली.

केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गँरेंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे. दुष्काळ, अवकाळी, गारपीट, कमी पर्जंन्य, पाणी टंचाई, पिकावरील रोग, वादळं अशी नैसर्गिक संकटं कायम उभी आहेतच.

वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक या संकटांचा सामना शेतकऱ्याच्या पाचवीला पुजला असून आता सरकार पुरस्कृत संकट उभी केली जात असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here