Home Breaking News चंद्रपूर जिल्ह्यात अपघाताचा कहर चालूच 4 ठार; कार कापून मृतदेह काढले बाहेर

चंद्रपूर जिल्ह्यात अपघाताचा कहर चालूच 4 ठार; कार कापून मृतदेह काढले बाहेर

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर. :-  आज रविवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास नागपूर वरून नागभीड च्या देशेने येणाऱ्या कारची समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स’ला समोरा-समोर धडक दिली. हि धडक इतकी भीषण होती की कारमध्ये बसलेल्या चार व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. तर यामध्ये एक महिला आणि मुलगी असे 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.

कारमधील एकूण सहापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक मुलगी व महिला गंभीर जखमी झालेली आहे. त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. मृत दोन महिला व दोन पुरुष अजूनही कारमध्ये फसून आहेत. घटनास्थळी नागभीड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पोहोचले आहेत. कार कापून मृतदेह काढण्याचे काम सुरु आहे.

जखमींना उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. घटनास्थळ गाठून नागभिड पोलिस दुर्घटनेचा तपास करीत आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे अद्याप नाव कळू शकले नाही. सबंधित व्यक्तीची पोलिस माहिती घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here