Home चंद्रपूर चंद्रपुरातील ट्राफिक पोलिसाचे होत आहे सर्वत्र कौतुक

चंद्रपुरातील ट्राफिक पोलिसाचे होत आहे सर्वत्र कौतुक

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  महामार्गावर पोलीस उभे दिसले की वाहचालक गाडी लांब उभी करतो किंवा माघारी फिरतो. उगाच यांच्या वाटेला कोण लागणार? चुकून वाटेला लागलच तर चलान तरी फाटेल नाहीतर खिसा खाली होणार हे ठरलेलं. अशी वाहनचालकांची पोलिसांबद्दल भावना असते. मात्र महामार्गावर प्रेमाने सरबत पाजणारे पोलीस बघून वाहनचालक चक्रवून गेले. चंद्रपूर-नागपूर महामार्गावर हे दृश्य दिसलं. सरबत प्या, शांत डोक्याने वाहन चालवा. असा प्रेमाचा संदेश यावेळी पोलीस देत होते. जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढली आहे. वाहचालकांकडून वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघात होत आहेत. त्यात मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी पोलीस विभागाने गांधींगिरीचं पाऊल उचललं आहे.

Previous articleचंद्रपूर जिल्ह्यात अपघाताचा कहर चालूच 4 ठार; कार कापून मृतदेह काढले बाहेर
Next articleमहाराष्ट्रातील 11 उड्डाणपूल आणि 9 रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण व भुयारी मार्गांचे भूमिपूजन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here