Home चंद्रपूर इरई नदीकाठालगत अतिक्रमनांवरील मनपा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

इरई नदीकाठालगत अतिक्रमनांवरील मनपा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  माहानगर पालिका मधील अधिकाऱ्यांमुळे चंद्रपूरच्या जनतेला पुराचा फटका बसत आहे. आजपर्यंत ठोस उपयोजना करण्यात आली नसल्यामुळे. इरई नदीकाठालगत अतिक्रमणे वाढली, असा आरोप करत चंद्रपूरकरांचा पुरापासून बचाव करण्यासाठी ही अतिक्रमणे हटविण्याची मागणी गोंडवाना विदर्भ मुक्त संघटनेचे संयोजक योगेश समरीत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

चंद्रपुरातील नागरिक अनेक वर्षांपासून इरई नदीच्या बॅक वॉटरचा त्रास सहन करीत आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कधीही उपाययोजना केली नाही. माना कोळसा खाणीजवळ बंधारे बांधून इरई नदीचे पाणी साठविले असते तर या पाण्याचे नियोजन करता आले असते. शिवाय, चंद्रपूर व बल्लारपूर शहराला लागणाऱ्या पाण्याची समस्या सुद्धा दूर झाली असती. नांदगाव खाणीला बंधाऱ्यात परिवर्तीत केल्यास इरई नदीच्या बॅक वॉटरला नियंत्रित करता येते, अशी मागणी २००८ मध्ये केली होती; परंतु दीर्घकालीन उपाययोजना न करता इरई नदी खोलीकरणावर कोट्यवधी खर्च केले. परंतु या खोलीकरणाच्या चंद्रपूरकरांना कोणत्याही प्रकारच्या उपयोग झाला नाही. चंद्रपूरला व चंद्रपुरातील नागरिकांना पाण्याच्या पुरापासून वाचविण्यासाठी नदीकाठावरील अतिक्रमने मोकळी करावीत, अशी मागणी योगेश समरीत यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here