Home चंद्रपूर आप ची मागणी

आप ची मागणी

शासकीय महाविद्यालयात न्युरॉलॉजी विभाग चालू करण्यासंबधी

अधिष्ठताना दिले निवेदन

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-चंद्रपूर मध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीज, फॅक्टरी, कोळसा खदान, पावर प्लांट आहेत तसेच वाहतूक वर्दळ ही भरपूर आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण पण वाढलेले आहे, तसेच नैसर्गिक आपत्ती मुळे देखील जीवित हानी होण्याची शक्यता असते, कोणताही अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास डोक्याला मार लागण्याची भीती जास्तीत जास्त असते, आपला चंद्रपूर मध्ये सरकारी दवाखाना आहे परंतु त्याच्यात न्यूरोलॉजी विभागच नाही , त्यामुळे जर डोक्याला मार लागला तर सरळ नागपूरला धावावं लागते, अशा वेळेस पेशंट जर वाचला तर वाचला नाही तर मरण्याची शक्यता वाढते, त्यामुळे आज दिनांक ३१/७/२०२३ रोजी आम आदमी पार्टी च्या महिला अध्यक्ष एडवोकेट सुनीता पाटील, महिला उपाध्यक्ष जास्मिन शेख, महिला उपाध्यक्ष रूपाताई काटकर, तसेच महिला पदाधिकारी, सुहास रामटेके, संतोष यादव, तब्बसुम शेख, पुष्पाताई बुधवारे, विद्या मोहुरले, ज्योती तोडासे यांनी मेडिकल कॉलेजचे डीन साहेब त्यांना निवेदन दिले आणि न्यूरोलॉजी विभाग सरकारी दवाखाना चंद्रपूर येथे तात्काळ चालू करा असे मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here