Home चंद्रपूर ज्याला कोणताही आधार नाही तिथे चंद्रपुरातील माणुसकी ग्रुप आधार म्हणून उभा असतो

ज्याला कोणताही आधार नाही तिथे चंद्रपुरातील माणुसकी ग्रुप आधार म्हणून उभा असतो

 

 

 

 

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  माणुसकी ग्रुप चे कार्य सांगावे असे नाही कारण चंद्रपुरातील नागरिकांनी ते जाणले आहे. की माणुसकी ग्रुप हा गोर गरीबांचा तसेच बेसाहारा व्यक्तींच्या दुत बनून या समाजात कार्य करत आहेत. सतत तसेच कार्य सांगायचे म्हणजे काही दिवसांपूर्वी यशवंत सिडाम दादांचा फोन माणुसकी ग्रुप कडे आला की त्यांच्या शेजारी राहणारे वृध्द रामकिशन गोरकर यांच्या पाय फॅक्चर झालेला आहे त्यांना मदतीचे गरज आहे. कारण त्यांना कोणी मुलं बाळ नाहीत व ते त्यांच्या पत्नी सोबत राहत असतात.

आपल्या संसाराचा उदरनिर्वाह करण्याकरिता ते वृद्ध व्यक्ती वयाच्या 70/72 व्या वर्षी सुद्धा पालन पोषण करिता कामाकरिता बाहेर पडत असतात व अचानक दिनांक 05,10,2023 गुरुवार ला त्यांचा पाय स्लिप झाल्यामुळे फॅक्चर झाला. कामा जवळील एका ऑटो चालकाने घरी आणून दिले. त्यांच्या शेजारी राहणारे यशवंत सिडाम दादांनी त्यांना तात्काळ गव्हर्मेंट हॉस्पिटल येथे नेऊन दाखल केले. असता तेथील डॉक्टरांनी त्यांचा उपचार इथे होणार नाही

असे सांगून त्यांना नागपूरला नेण्याकरिता सांगितले तसेच तिथून लगेच त्या वृद्धाला घेऊन यशवंत सिडाम मुसळे हॉस्पिटल येथे आणून दाखल केले व तेथील डॉक्टरांनी त्या वृद्धावर उपचार सुरू केला असता यशवंत सिडाम यांचा फोन माणुसकी ग्रुपला आला व त्यांनी मदतीकरिता माणुसकी ग्रुपच्या मेंबर्सना तिथे बोलावले माणुसकी ग्रुपचे टीम लगेच सायंकाळी 06,30 ला मुसळे हॉस्पिटल येथे पोहचुन त्या वृद्धांना भेट दिली त्यांची प्रकृती बघितली व त्यांना जो काही खर्च या ऑपरेशन मध्ये लागत आहे.

तो आम्ही आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तसेच सिडाम दादांच्या मदतीने पूर्ण करू असे तिथे बोलणे करून त्यांचा पुढील उपचार करण्याकरिता सांगितले व दिनांक 06,10,2023 ला या वृद्धांचा पायाचे ऑपरेशन झाले डॉक्टरांनी त्यांना दोन दिवसात डिस्चार्ज देऊ असे सांगितले आणि आज दिनांक 08,10,2023 ला त्यांना डिस्चार्ज करण्यात आले. डिस्चार्ज झाल्यावर माणुसकी ग्रुपचे टीम मेंबर्स हॉस्पिटल ला गेले आणि पूर्ण प्रोसेस करून हॉस्पिटलचे बिल भरून तिथून त्या वृद्धांना ऑटो मध्ये बसवून माणुसकी टीमचे काही मेंबर त्यांच्यासोबत त्यांच्या घरापर्यंत त्यांना पोहोचवून देण्यास मदत केली.

आणि याच्यापुढे सुद्धा या व्यक्तीच्या जो काही पण खर्च उदा,,औषध, ,किराणा, लाईट बिल आणि त्यांच्या रोजचा जेवणाचा वगैरे खर्च पूर्ण पणे माणुसकी ग्रुपच्या टीमने जिमेदारी घेतलेनि आहे. या कार्यात सर्वात मोठी मदत हॉस्पिटलचे बिल व हॉस्पिटल मध्ये भरती करण्याचे काम यशवंत सिडाम यांनी केलेले असून.तसेच माणुसकी ग्रुप व बाहेरून सुद्धा काही लोकांची मदत मिळालेली आहे

                  मदत मिळालेल्यांची काही नावे

राकेश अग्रवाल,यशवंत सिडाम,माणुसकी ग्रुप,पियूष धकाते,शैलेश खोब्रागडे,पवन केटरर्स,अतुल बोडे, रमिज भाई राजुरा,(समाज सेविका) नेत्रा इंगुलवार मॅडम,विपुल मुळे,दामोदर रामटेके चिमूर,अंकुर गंनुरवार,सुनील बोडेकर

       माणुसकी ग्रुपच्या नागरिकांना संदेश

कोणालापण सामाजिकरित्या वाढदिवस किंवा सामाजिक कार्य करायचं असल्यास किंवा बेसहरा व्यक्ती आढळल्यास माणुसकी गृपशी संपर्क साधावा.
संपर्क:-8055407941/8999645084

Previous articleगितेश सातपुते यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या भद्रावती शहर अध्यक्ष पदी नियुक्ती
Next articleचंद्रपुरातील मनसेच्या महिला जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकूर सह भरत गुप्ताचा मनसेला अखेरच्या सलाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here