Home चंद्रपूर चंद्रपुरातील मनसेच्या महिला जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकूर सह भरत गुप्ताचा मनसेला अखेरच्या सलाम

चंद्रपुरातील मनसेच्या महिला जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकूर सह भरत गुप्ताचा मनसेला अखेरच्या सलाम

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भरत गुप्ता वरील पदावर आक्षेप घेतलेली पत्रकार परिषद ठरली चंद्रपूर जिल्ह्यात ‘मनसे’चे इंजिन घसरन्याचे कारण

चंद्रपूर  :-  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रेल्वे इंजिन जिल्ह्यात अजूनही रुळावर आले नसल्याचे चित्र आहे. त्यातच आता एक-एक करीत पदाधिकारी मनसेला रामराम ठोकत आहे. चंद्रपुरातील मनसेच्या महिला जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकूर यांनीही मनसेला अखेरला सलाम ठोकत शिवसेना शिंदे गटाचा झेंडा हातात घेतला आहे. त्यामुळे मनसेला जिल्ह्यात पुन्हा धक्का बसला आहे.

दोन दिवसांपूर्वीच विदर्भ प्रमुख किरण पांडव यांच्या मार्गदर्शनामध्ये मुंबई येथील बाळासाहेब भवन नरिमन पॉइंट येथे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश घेतला. यावेळी सहसंपर्कप्रमुख बंडू हजारे, जिल्हाप्रमुख नितीम मत्ते, युवासेनेचे सूर्या अडबाले, जमील शेख, नागपूरचे प्रफुल्ल माननोडे, भरत गुप्ता, यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते. विशेष म्हणजे, ठाकूर यांनी मनसेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासह विविध आंदोलनांच्या माध्यमातूनही त्यांचा चंद्रपुरात मनसेला वाढविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

                       भरत गुप्ताही शिंदे सेनेत प्रवेश

मनसेचे भरत गुप्ता यांनीही शिंदे सेनेत पक्षप्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे, मनसेमध्ये वाहतूक सेनाप्रमुख म्हणून कार्य करीत होते.यांच्या चंद्रपुरातस नाही तर चंद्रपुरातील गावागावातील मनसेमध्ये पक्ष वाढवण्याचे काम व मनसेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासह विविध आंदोलनांच्या माध्यमातूनही भरत गुप्ता यांनी खूप सक्रियपणे जीमेदारी पार पाडत होते. दरम्यान, मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदावरच आक्षेप घेत पत्रकार परिषदही घेतली होती. याचा परिणाम आता चंद्रपुरातील मनसेला एक नाही तर दोन चागले सक्रिय पदाधिकारी गमावावे लागले. यानंतर मात्र गुप्ता यांनीही मनसेला रामराम ठोकला व शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला.

Previous articleज्याला कोणताही आधार नाही तिथे चंद्रपुरातील माणुसकी ग्रुप आधार म्हणून उभा असतो
Next articleमहाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मराठी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन भोयर, व माजी नगरसेवक सचिन भोयर,यांच्या पुढाकाराने चंद्रपूर महानगर पालिकेत मनसे प्रणित मराठी कामगार सेनेची एन्ट्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here