Home चंद्रपूर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मराठी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन भोयर, व माजी...

महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मराठी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन भोयर, व माजी नगरसेवक सचिन भोयर,यांच्या पुढाकाराने चंद्रपूर महानगर पालिकेत मनसे प्रणित मराठी कामगार सेनेची एन्ट्री

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-   सध्या चंद्रपूर महानगरपालिका कोणत्या ना कोणत्या कारणास्त कंत्राटी कामगारांना त्रास देने सुरू केले आहे. उदा, कामावरून कमी करणे, त्यांना मासिक त्रास देने, पगार न देणे पागार किमान वेतननुसार न टाकणे, किमान वेतन असून सुद्धा कमी पगार टाकणे, कोणतेही कारण नसताना कामगाराबद्दल दोष निर्माण करून त्यांना कामावरून काढणे, पगार कपात करणे मग ते कामगार चंद्रपुरातील घाण कचरा उचलणारे घंटा गाडीवाले असो किव्हा नाली सफाई कर्मचारी असो अथवा पाणीपुरवठातील कर्मचारी असो किव्हा फायर मधील कर्मचारी

म्हणजेच चंद्रपुरातील महानगरपालिका जणू कंत्राटी कामगारावर अन्याय करण्याचे विचार करून बसलेले आहे. की काय असा विचार चंद्रपुरातील नागरिकांना व येथील कर्मचाऱ्यांना येत आहे. म्हणूनच आता चंद्रपुरातील कंत्राटी कर्मचार कोणत्या ना कोणत्या संघटनाच्या अध्यक्ष सहकारी सोबत घेऊन आपले न्याय व हक्काच्या लढाईसाठी लढत आहे. यातच आता चंद्रपुरातील महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मराठी कामगार सेना नितीन भोयर जिल्हा अध्यक्ष, चंद्रपूर मराठी कामगार सेना मध्ये चंद्रपुरातील समस्त कंत्राटी सफाई कामगारांनी मनसे प्रणित मराठी कामगार सेनेचे सभासत्व स्वीकारत

मनसे प्रणित मराठी कामगार सेनेची युनियन स्थापन केली आहे. कारण यांना सुद्धा चंद्रपूर मधील महानगरपालिकाती कंत्राटी ठेकेदार ना किमान वेतन देत ना कोणत्या प्रकारची सुरक्षा कवच आता यांना सुद्धा स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि परिवारातील लोकांना खाण्यापुरते तरी मुबलक पैसा मिळावा यासाठी यांनी सुद्धा मनसे प्रणित मराठी कामगार सेनेत प्रवेश केला आहे. त्याबाबतचे पत्र आज सहायक कामगार आयुक्त व मनपा आयुक्तांना देण्यात आले.

सफाई कामगार मधील मनसे प्रणित मराठी कामगार सेनेची बॉडी नियुक्त करण्यात आलेली आहे. त्यांचे पुढील पद व नाव यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मराठी कामगार सेनेचे नितीन भोयर  जिल्हाध्यक्षांनी घोषित केलेले आहे.

१) नशीब अशोक गेडाम – अध्यक्ष २) स्वप्नील सुभाष इचगिलवार – उपाध्यक्ष ३) बंडु धर्माजी जुमनाके सचिव ४) चंद्रशेखर विक्रम निमगडे-सहसचिव ५) बुद्वकुमार तुकाराम अलोणे-कोषाध्यक्ष ६) कार्तिक कैलाश बनकर-संघटक ७) राजेश निरंजन रॉय-सहसंघटक ८) विदेश बाबा तोतडे – सल्लागार सदस्य- सुशील प्रकाश अक्केवार, गौतम महादेव शेंडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here