Home चंद्रपूर चंद्रपूर महानगर पालिकेतील या वार्डातील विद्यार्थी व विद्यार्थिनीं केल्या घरांचा भिंती बोलक्या

चंद्रपूर महानगर पालिकेतील या वार्डातील विद्यार्थी व विद्यार्थिनीं केल्या घरांचा भिंती बोलक्या

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  दर वर्षी महानगर पालिका चंद्रपूर च्या वतीने पर्यावरण पूरक गणेश मंडळ स्पर्धा आयोजित केली जाते. त्या अनुषंगाने मागील तीन वर्षा पासून श्री नवयुक बाल गणेश मंडळ, दत्त नगर, नागपूर रोड, चंद्रपूर या स्पर्धेत प्रथम क्रमांक घेत आलेला आहे.

या वर्षी सुद्धा महानगर पालिकेच्या वतीने गणेश मंडळ साठी होत असलेल्या स्पर्धेत भाग घेतला असून त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून दत्त नगर येथील

ये जा करणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घरे आहे. त्या घरांच्या घरांचा भिंतीवर अनेक विषयांचे चित्रे विद्यार्थ्यांनी तयार केले ज्या मध्ये स्वच्छ भारत सुंदर भारत, पाणी वाचवा, झाडे लावा, स्री – पुरुष समानता, पंच तत्व लोगो, मुलगी शिकवा, मुलगी वाचवा, सौर ऊर्जेचे महत्व, डेंग्यू जनजागृती, वारली चित्रकला, व्यसन मुक्ती, असे अनेक विषय विद्यार्थी व विद्यार्थिनीं साकारले आहे.

या भीती इतक्या बोलक्या झाल्या आहे की येथील सर्व परिसरातील जनतेचे लक्ष वेधून घेत आहे.

ही सर्व चित्रे तयार करण्यामध्ये केतन बुरडकर, मनप्रीत गील, रिया गेडाम, विधी राळे, आदित्य अर्जूनकर, क्षितिज राळे, अनोखी देशपांडे, कृतिका अर्जूनकर, विदिशा नक्षिने, निशा खंदारे, स्नेहल कालडींगे, युगांत चींचाळकर, वेदांत पोटे, शीतल सिडामा, संदेश भिडेकर, मनी सोंत्रे, सतीश चंदेल, आकाश पोटे, यांनी सहभाग घेवून दत्त नगर, नागपूर रोड, चंद्रपूर येथील भिंतीना बोलके केले आहे.म्हणूनस सर्वत्र या बालकांचे कौतुक होत आहे. परिसरातील अनेक नागरिक ही चित्रे पाहण्यासाठी येत आहे.

Previous articleमहाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मराठी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन भोयर, व माजी नगरसेवक सचिन भोयर,यांच्या पुढाकाराने चंद्रपूर महानगर पालिकेत मनसे प्रणित मराठी कामगार सेनेची एन्ट्री
Next articleचंद्रपूर महानगरपालिका नवरात्र उत्सवासाठी सुरु करण्यात आलेली एक खिडकी सुविधेअंतर्गत आतापर्यंत ५१ मंडळांना परवानगी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here