चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील 80 शेतकऱ्यांच्या वीज पंपाचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीने तोडले.
टेमुर्डा प्रतीनीधी .(धनराज मा बाटबरवे मो.7498923172)
राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी विधानसभा निवडणूकीत घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आल्यानंतर मात्र राज्याला आर्थिक शिस्त लावण्याच्या सबबिखाली शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही, उलट 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरावे असे फर्मान अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले की अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी फर्मान सोडले त्याबद्दल आपलं काय मत आहें तर फडणवीस म्हणाले की अजित पवार यांनी मांडलेली भूमिका ही सरकारची आहें.पण मग प्रश्न हा निर्माण होतो की फडणवीस यांनी जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी हा फडणवीस यांचा फसवा डाव ठरला असून आता राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याच्या योजनेचा सुद्धा फज्जा उडाला असल्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याच्या प्रकारवरून दिसून येत आहें
वरोरा तालुक्यातील 82 शेतकऱ्यांचे कनेक्शन कापले
राज्यातील शेतकऱ्यांना सिंचणासाठी मोफत वीज देऊ अशी घोषणा करून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचा फेखावा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योजनेला केराची टोपली दाखविणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वरोरा तालुक्यातील 82 शेतकऱ्यांचे कनेक्शन कापले आहे शेतकऱ्यांना सरसकट संपुर्ण विज मोफत देऊ म्हणुन शासनानी सांगितले होते आणि आता शेतकऱ्यांना कोणतीही पुर्व सुचणा न देता आम्हाला वरुन आदेश आहे 7.5.hp चे वीज पंपाचे कनेक्शन कापले गेले आहें.
दरम्यान नुकतेच आर्वी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले होते की राज्यात ४६ लाख सहा हजार कृषिपंपधारक शेतकऱ्यांची वीज बिल माफ करू दरम्यान साडेसात अश्वशक्ती कृषिपंप वापरणाऱ्या शेतक-यांना या थकीत वीज बिल माफीचा फायदा होणार असल्याचे पण म्हटले होते, एवढेच नव्हे तर राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना डिसेंबर २०२६ पर्यंत वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल, तसेच येत्या पाच वर्षांत राज्यातील सामान्य नागरिकांचे वीज बिल दरवर्षी कमी होईल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिनांक 13 एप्रिल 2025 ला आर्वी केले. पण लबाडाचं आवतन जेवल्यावरच खरं अशी जी म्हण आहें तशाच प्रकाराची परिस्थिती आज राज्य सरकारची दिसत आहें.