Home भद्रावती गितेश सातपुते यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या भद्रावती शहर अध्यक्ष पदी नियुक्ती

गितेश सातपुते यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या भद्रावती शहर अध्यक्ष पदी नियुक्ती

शहराची जबाबदारी मिळताच गितेश सातपुते यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव.

भद्रावती प्रतिनिधी :

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या आणि स्वतःचा व्यवसाय सांभाळून जनहितासाठी वेळ देणाऱ्या गितेश सातपुते यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी त्यांची भद्रावती शहराच्या शहर अध्यक्ष पदी नियुक्ती केल्याने गितेश सातपुते यांच्या निकटवर्ती सहकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत॑ आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भद्रावती शहर अध्यक्ष पदी गितेश सातपुते यांची नियुक्ती करण्यात येत आल्याचे नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी दिले आहे यावेळी चंद्रपूर शहर अध्यक्ष राजीव कक्कड व वरोरा भद्रावती विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर उपस्थित होते.

गितेश सातपुते यांच्या नियुक्तीने भद्रावती शहरात राष्ट्रवादी पक्षाची ताकत वाढेल असे संकेत मिळतं असुन पक्ष संघटन वाढविण्यासाठी पूर्ण जोर लावून नगरपरिषद निवडणुकीत पक्षाचे नगरसेवक व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात आमदार निवडून आणू अशी प्रतिक्रिया गितेश सातपुते यांनी व्यक्त केली.

Previous articleचंद्रपुरातील मनपा आयुक्तच्या अजब निर्णय कामगारांना न्याय देने सोडून त्याच्या कामावर उपयोजनाचे होल्डिंग
Next articleज्याला कोणताही आधार नाही तिथे चंद्रपुरातील माणुसकी ग्रुप आधार म्हणून उभा असतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here