उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांनीचं रविवारच्या सुट्टीच्या दिवशी अवैध वसुली करिता गाडी पाठवली का? अधिकाऱ्यावर कार्यवाहीची मागणी.
भद्रावती प्रतिनिधी जावेद शेख :-
प्रत्येक गाडी मालकाकडून बेकायदेशीर वसुली करणाऱ्या व लायसन्स असो की गाडीचे फिटनेस किंव्हा सिमा नाका वसुली असो भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांचे कार्यालय सध्या चर्चेत असतांना सुट्टीच्या दिवशी रविवारला अवैध वसुली करिता निघालेल्या MH04KR6434 या स्कोर्पिओ गाडीने घोडपेठ जवळ दोन गाईना जोरदार धडक दिल्याने एकीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गाय सुद्धा मृत्युंच्या दारात असल्याची खळबळजनक घटना आज सायंकाळी घडली असून गाय मालकांना भद्रावती पोलीस स्टेशनं मध्ये नेऊन धमकावण्याचा प्रकार आरटीओ निरीक्षक व कर्मचारी यांनी केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या आरटीओ गाडी चालाक व तिथे बसलेल्या आरटीओ अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी होतं आहे.
वरील आरटीओच्या स्कोर्पिओ गाडीने त्या गाईना एवढी जोरदार धडक दिली की त्या धडकीत स्कोर्पिओ गाडीचे समोरचे टप्पर व लाईट सुद्धा फुटले आहे, ह्या आरटीओच्या स्कोर्पिओ गाडीने वरोरा भद्रावती तालुक्यात धुमाकूळ घातला असून ट्रक व इतर गाड्यांचा पाठलग करणे व त्या गाडी चालकाकडून चिरीमिरी घेऊन गाड्या सोडून देणे हेच काम सुरु आहे, अगोदरच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांची ईडी चौकशीची मागणी चर्चेत असून आता त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या निरीक्षकांना त्यांनी अवैध वसुली करिता खुली सूट दिली का याची शंका आहे. आता या शेतकऱ्यांच्या गाईच्या नुकसानीची भरपाई कोण देणारं? आरटीओ मोरे देणारं की मग ते निरीक्षक देणारं हे उद्या सर्वाना कळणार आहे.
भद्रावती पोलीस स्टेशनं मध्ये गाय मालकावर आरटीओ अधिकाऱ्यांचा दबाव?
दोन गाईना धडक दिल्याचं प्रकरण अंगलट येईल या भीतीने भद्रावती पोलीस स्टेशन येथे गाई मालक यांना बोलावून सेटलमेंट करण्यासाठी आरटीओ अधिकारी आले असून गाय मालकावर ते दबाव ताकत असल्याची माहिती आहे, दुसऱ्यांना गाडी हळू चालवा हे सांगणारे आरटीओ अधिकारी स्वतःचं नियमांच उल्लंघन करत असतील व ब्रेकर समोर आहे हे माहीत असतांना 90 च्या स्पीड ने गाड्या धावत असतील तर अशा अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, दरम्यान आरटीओ च्या या अपघातात गाई ठार झाल्याने शेतकरी संतापले असून यासाठी आता घोडपेठ परिसरातील शेतकरी आंदोलन पण करेल अशी माहिती आहे.
हा कोण गजानन माणिकराव ढाले? जो पत्रकाराला धमकावतो.
आरटीओ च्या गाडीने गाईना धडक दिल्यानंतर हे प्रकरण भद्रावती पोलीस स्टेशन येथे आले असता तिथे पत्रकार जावेद शेख गेले असता त्यांना गेट आउट म्हणून ठाण्यातून हाकलून देण्याची भाषा करणारे हे गजानन माणिकराव ढाले कोण आहेत ते आरटीओ चे अधिकारी आहेत की कर्मचारी की एजंट आहेत याचा शोध सुरु असून अवैध वसुलीने पैशाचा माज आल्याने यांची भाषा बदलली की काय असा प्रश्न निर्माण होतं आहे.