Home चंद्रपूर दखलपात्र :- तिरावंजा येथील अवैध गौण खनिज उत्खननाचे मोजमाप प्रशासन करेल ?

दखलपात्र :- तिरावंजा येथील अवैध गौण खनिज उत्खननाचे मोजमाप प्रशासन करेल ?

ट्रांसपोर्टर शामकांत थेरे व त्यांच्या शिवा सचिन प्रशांत चन्ने व नगराळे या सहकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला मग प्रशासन गप्प का ?

चंद्रपूर :-

मागील अनेक महिन्यांपासून ट्रांसपोर्टर शामकांत थेरे व शिवा, सचिन, प्रशांत, चन्ने व नगराळे या सहकाऱ्यांच्या माध्यमातून छोटा नागपूर रस्त्यांनी मौजा तिरावंजा परिसरात केवळ 200 ते 300 ब्रॉस गौण खनिज उत्खनन करण्याची तात्पुरती परवानगी मिळाली असतांना त्या जागेतून त्यांनी हजारो ब्रॉस मुरुम सारखा गौण खनिज उत्खनन करून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविला असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे, त्यामुळे तहसीलदार भद्रावती व उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी या प्रकरणी त्वरित चौकशी करून व निर्णय घेऊन त्या अतिरिक्त गौण खनिज उत्खनन ठिकाणी मोजमाप करावे व कोट्यावधी रुपयांच्या गौण खनिज चोरीचा प्रकार समोर आणून तो गौण खनिज ज्या वाहनांनी ट्रांसपोर्ट करण्यात आला व ज्या पोकलॅन मशीन द्वारे उत्खनन करण्यात आला त्या वाहन व मशीन जप्त करण्यात याव्या अशी मागणी जोर पकडू लागली आहे.

भद्रावती तालुक्यातील तीरवंजा परिसरात ट्रांसपोर्टर शामकांत थेरे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून मंजूर उत्खननापेक्षा कितीतरी पटीने गौण खनिज उत्खनन करून तिथे मोठमोठे खड्डे तयार केले आहे. दरम्यान हा भाग अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्याने वाघ बिपट सारखे जंगली प्राणी हे त्या ठिकाणी वावरत असते, शिवाय गुराखी आपले गुरेढोरे बकऱ्या येथे चरायला आणतात पण या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असतांना खड्ड्यात पडून त्यांना जीव गमवावा लागू शकतो.

शामकांत थेरे यांचे अवैध गौण उत्खनन व अवैध पणे रेती उत्खनन करून शासनाचा महसूल चोरी करण्याचा जणू धंदाचं बनला असल्याने त्यांच्या चलअचल संपतीची चौकशी केल्यास यांच्याकडून आजपर्यंत कोट्यावधी रुपयांचा महसूल चोरी करून स्वतःची प्रॉपर्टी जमा केली असल्याचे समोर ययेऊ शकते. त्यांच्या या अवैध गौण खनिज उत्खननाला महसूल अधिकारीचं जबाबदार असुन त्यांच्या सहमतीनेचं हे अवैध गौण खनिज उत्खनन होत॑ असल्याने या प्रकरणी l या गौण खनिज उत्खनन केलेल्या जागेचे मोजमाप करून त्यांचे मूल्यांकन व मूल्यांचे दंड आकारून तो पैसा सरकार जमा करावा व बेकायदेशिर गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी शामकांत थेरे व इतरांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी सुद्धा मागणी होत॑ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here