तोतया अधिकारी बनून खंडणीसाठी अपहरण केल्या प्रकरणी चामोर्शी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल.
भद्रावती प्रतिनिधी :-
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांना चार दिवसांपूर्वी चामोर्शी पोलिसांनी तोतया अधिकारी बनून खंडणी करिता अपहरण केल्या प्रकरणी भद्रावती येथून अटक केल्यानंतर पहिल्यांदा भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल द्वारे बातमी प्रकाशित झाली होती, दरम्यान इतर कुठल्याही बातमी पत्रात ही वार्ता आली नसल्याने भद्रावती शहरात आणि तालुक्यात तर्कवितर्क व चर्चेला उधाण आले होते, मात्र अवघ्या दोन दिवसांतच चामोर्शी पोलिसांनी या प्रकरणात गुप्तता बाळगून आकाश वानखेडे यांच्या साथीदार असलेल्या माजरी येथील अनेक नावांनी कुप्रसिद्ध महिला, दैनिक लोकमत चे माजरी प्रतिनिधी तथा भाजपाचा कार्यकर्ता चैतन्य कोहळे व भद्रावती येथे राहणारा दिलीप पोइनकर यांना अटक केली आहे.दरम्यान आरोपीना 7 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली असून आरोपीचा कसून समाचार घेतला जात असल्याची माहिती आहे.
आकाश वानखेडे यांनी टोळी बनवून राजकीय वाटचाल सुरू केली व तीं आता गुंडगिरीतून समोर येतं आहे, दरम्यान त्यांच्यावर चामोर्शी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेले गुन्हे बघता त्यांच खरं राजकीय चरित्र समोर आलं आहे. सत्तेचा दुरुपयोग करून गैरमार्गाने पैसे कमाविण्यासाठी त्यांनी अनेकवेळा ब्लॅकमेलिंगची खेळी केली असल्याचे बोलल्या जातं आहे, खरं तर राजकारणात अमाप पैसा कमाविण्याच्या नादात कधी कधी राजकीय शिकार होते ते या प्रसंगातून समोर येतं आहे. दरम्यान त्यांच्या सोबत असलेल्या चैत्यन्य कोहळे या लोकमत प्रतिनिधीची पत्रकारिता सुद्धा या प्रकरणामुळे उघड झाली असल्याने पत्रकारिता क्षेत्रात सुद्धा खळबळ उडाली आहे.