Home चंद्रपूर अखेर आशा, गटप्रवर्तकांचा २२ दिवसांनंतर संप मागे

अखेर आशा, गटप्रवर्तकांचा २२ दिवसांनंतर संप मागे

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

चंद्रपूर  :-  आशावर्करला सात हजार रुपये, गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन, दिवाळी बोनस दोन हजार रुपये आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंत्राटदाराचा दर्जा देण्याचे गुरुवारी मुंबईत झालेल्या चर्चेत मान्य करण्यात आले. प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याने कृती समितीने संप मागे घेतला. हा संप तब्बल 22 दिवस

चालला. महाराष्ट्र राज्य आरोग्यखाते आशा कृती समितीच्या नेतृत्वात मानधन वाढ, दिवाळी बोनस आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याच्या मागणी घेऊन १८ ऑक्टोबरपासून संप पुकारला. या संपात चंद्रपूर जिल्ह्यातील २२०० आशावर्कर आणि गटप्रवर्तक सहभागी झाले होते. संपादरम्यान राज्य शासनाने लक्ष वेधून घेण्यासाठी आशा,

गटप्रवर्तकांनी मोर्चा, निदर्शने केली. मधल्या काळात कृती समितीची चर्चा , झाली. मात्र, या बैठकीत गटप्रवर्तकांना आशांच्या तुलनेते कमी वाढ जाहीर केली. कंत्राटी दर्जाबाबत निर्णय न प केल्याने गटप्रवर्तक व आशांमध्ये असंतोष होता. त्यामुळे कृती समितीने संप सुरूच ठेवला होता. दरम्यान मुंबई येथे झालेल्या बैठकीत मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.

दरम्यान, गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढीचा आणि आशांना सात हजार रुपये वाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला आहे. त्यानंतर कृती समितीने मागे घेतल्याची माहिती आयटकचे राज्य सचिव विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष दिलीप बर्गी, रवींद्र उमाटे, प्रकाश रेड्डी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिली.

Previous articleदिवाळीच्या पहिल्याच दिवशी अम्मा का टिफिन परिवारासोबत आमदार किशोर जोरगेवार, गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार, दिवाळी केली साजरी स्नेहमिलन व आरोग्य शिबिर कार्यक्रमाचे आयोजन
Next articleदखलपात्र :- तिरावंजा येथील अवैध गौण खनिज उत्खननाचे मोजमाप प्रशासन करेल ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here