Home चंद्रपूर शहराची सुंदरता व स्वच्छतेमध्ये नागरीकांचे योगदान महत्वपूर्ण : सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

शहराची सुंदरता व स्वच्छतेमध्ये नागरीकांचे योगदान महत्वपूर्ण : सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  नियमित स्वच्छता व शहर सुशोभिकरणाच्या माध्यमातून शहराचे रूप बदलत असते. त्याकरीता शहराच्या सुंदरतेत व स्वच्छतेमध्ये नागरिकांचे श्रम आणि त्यांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे सुंदर माझी ओपन स्पेस, सुंदर माझे उद्यान व शहर सौंदर्याकरण आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी भाजपा महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, माजी समाजकल्याण सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर ब्रिजभुषण पाझारे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोटूवार, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, इको-प्रो चे बंडू धोत्रे, पोलीस निरीक्षक राजपूत, अभय पडगेलवार, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचा-यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

माझं शहर सुंदर आणि स्वच्छ असावे, याच मानसिकतेतून नागरिकांनी श्रमदान व योगदान द्यावे, असे आवाहन करीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शहराच्या सौंदर्गीकरणासाठी महानगरपालिकेने सुंदर माझे उद्यान, सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व नागरीक एकत्रित आले. लहान मुले जेव्हा उद्यानात खेळायला जातात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. लाखो रुपये खर्च करून देखील असा आनंदी चेहरा बघता येत नाही. त्यासाठी उद्याने उत्तम करा आणि ओपन स्पेस विकसित करा, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये आज सर्वाधिक उद्याने आहेत. घुग्गूसमध्ये १० पेक्षा जास्त उद्याने, बल्लारपूरमध्ये १४ पेक्षा जास्त ओपन स्पेस विकसित केले तर चंद्रपूर शहरामध्ये महानगरपालिकेने वैशिष्ट्यपूर्ण निधीतून १५ पेक्षा जास्त बालउद्याने विकसित केली आहेत. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यान, ऑक्सीजन पार्क, जॉगर्स पार्क आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे, उत्तम व सुंदर अशा बॉटनिकल गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे. वनमंत्री झाल्यावर महाराष्ट्रात वृक्ष लागवडीचा उपक्रम सुरू केला. एका दिवसात २ कोटी ८७ लक्ष वृक्ष लावण्याचा संकल्प केला आणि जनतेने यात सहभाग घेतला. राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर वृक्ष लागवड करण्यात आली होती. दाट जंगलाचा भास होईल इतक्या

सुंदर वृक्षाचा विस्तार त्या ठिकाणी झाल्याचे पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले.पुस्तिकेचे तसेच नुतनवर्षाच्या कॅलेडंरचे विमोचन: यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सुंदर माझे उद्यान व सुंदर माझी ओपन स्पेस या पुस्तिकेचे तसेच २०२४ नुतनवर्षाच्या कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले.

उत्कृष्ठ कार्य व योगदानाबद्दल अधिकाऱ्यांचा सत्कार : गणेशोत्सवात योगदान दिल्याबद्दल सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, दुर्गापूर पोलीस स्टेशनचे चिंतावार तसेच शहर पोलीस स्टेशनचे राजपूत, डॉ. अमोल शेळके, मनिषा कन्नमवार यांचा पालकमंत्री सुधीर

मुनगंटीवार यांच्या हस्ते शॉल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सुंदर माझे उद्यान स्पर्धा पुरस्कार: महानगरपालिकेमार्फत २३ जुलै ते ३१ ऑगस्ट दरम्यान सुंदर माझे उद्यान व सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धा राबविण्यात आली. यामध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त जलमंदीर उद्यान सिव्हील लाईन चंद्रपूर, द्वितीय पुरस्कार प्राप्त दिनदयाल उद्यान, तुकूम तर तृतीय पुरस्कार प्राप्त महात्मा बसवेश्वर उद्यान, वडगाव या गटास पालकमंत्री सुधीर

मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धा पुरस्कार या स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त कर्मवीर खुले मैदान, सरकार नगर चंद्रपूर, द्वितीय पुरस्कार प्राप्त वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता संघ, द्वारका नगर, तुकूम तर तृतीय पुरस्कार प्राप्त पसायदान जेष्ठ

नागरीक, बहुउद्देशीय मैदान या गटास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. गणेश मंडळाना प्रोत्साहनपर पुरस्कार गणेश मंडळाना उत्स्फुर्त सहभागाबद्दल जयहिंद गणेश मंडळ, सार्वजनिक गणेश

मंडळ, ओम गणेश मंडळ, जोडदेऊळ पठाणपुरा गणेश मंडळ आदी मंडळांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला. तर दत्तनगर येथील नवयुवक बाल गणेश मंडळास विशेष पर्यावरणपुरक प्रथम पुरस्कार देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here