Home लक्षवेधी दखलपात्र :- रोजगार मेळाव्यात मनसे नेते राजु उंबरकर यांनी घडविला इतिहास,

दखलपात्र :- रोजगार मेळाव्यात मनसे नेते राजु उंबरकर यांनी घडविला इतिहास,

रोजगार मेळाव्यात तब्बल 5 हजार पेक्षा जास्त तरुण बेरोजगारांना मिळाले नियुक्ती पत्र,

वणी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांच्या सामाजिक कार्याची जर यादी वाचली तर अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांना चक्कर येईल एवढा मोठा सामाजिक कार्याचा डोलारा त्यांनी सांभाळला आहे. दरम्यान त्यांनी काल दिनांक ३ डिसेंबर ला आयोजित केलेला रोजगार मेळावा हा “न भूतो न भविष्यती” असा विक्रमी मेळावा म्हणावा लागेल, कारण त्यांच्या रोजगार मेळाव्यात तब्बल ५ हजार पेक्षा जास्त तरुण बेरोजगारांना चक्क नियुक्ती पत्र देऊन त्यांना अधिकृत अशी नौकरी देण्यात आल्याने राजु उंबरकर यांनी नवा इतिहास घडविला असल्याचे प्रत्यक्षदर्शी लेखी पुरावे मिळाले आहेत. दरम्यान नियुक्ती पत्र मिळालेल्या उमेदवरांच्या चेहऱ्यावरचे हास्य खूप काही सांगून जात होते व मनसे नेते राजू उंबरकर यांना भेटून ते “सर धन्यवाद. थँक्स सर” असे बोलून पाया पडत होते.

“ज्यांची स्वप्ने दमदार असते त्यांनाच ध्येयप्राप्ती होते निव्वळ पंख असुन चालतं नाही तर जिद्दीमुळे उडान सफल होते.” वरील ओळी जर लक्षात घेतल्या तर माणूस आपल्यां ध्येय आणि जिद्दीच्या भरोशावर काहीही करू शकतो. एकीकडे जवळपास राजकीय नेते आश्वासनांची खैरात वाटून निवडणुका जिंकतात तर दुसरीकडे एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी कुठलीही राजकीय सत्ता नसतांना जनतेच्या ज्वलंत समस्या पैकी एक असलेली बेरोजगारी ही समस्या दूर करण्यासाठी आपल्यां पदाचा योग्य वापर करतोय आणि तब्बल ५ हजार पेक्षा जास्त तरुण बेरोजगारांना रोजगार देतो हा खरे तर त्यांच्या ध्येय आणि जिद्दीचा विजय म्हणावा लागेल, कारण जनतेसाठी काही तरी करायचं हे ध्येय बाळगून प्रत्यक्ष कृती करणारा नेता राजू उंबरकर हा नेता जगवेगळा आहे आणि त्यांचा आदर्श राजकीय पुढाऱ्यांनी घ्यावा असाच भव्य दिव्य रोजगार मेळावा वणी येथे आयोजित करून त्यांनी मुबंई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या भागातील 70 पेक्षा जास्त कंपन्याना बोलावले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here