Home चंद्रपूर चंद्रपुरातील रामनगर पोलीस ठाण्यात शिंदे गट – ठाकरे गट भिडले

चंद्रपुरातील रामनगर पोलीस ठाण्यात शिंदे गट – ठाकरे गट भिडले

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

पोलिसावर हात उगारण्याचा सुद्धा प्रयत्न

चंद्रपूर  :-  चंद्रपूरात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रामनगर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी मोठा राडा झाला. शिंदे गटाच्या नेत्या प्रतिमा ठाकूर आणि ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकर यांच्या समर्थकांमध्ये ही धक्काबुक्की झाली.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भांडणानंतर दोन्ही गट काल रात्री परस्परांविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गोळा झाले होते. या वेळी दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक व नंतर धक्काबुक्की झाली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मिलिंद दोडके या पोलीस कर्मचाऱ्याला देखील झटापटीत धक्काबुक्की झाली.

पोलिसांनी प्रतिमा ठाकूर आणि स्वप्नील काशीकर यांच्यासह दोन्ही गटाच्या ८ लोकांवर ३५३ (शासकीय कामात अडथळा आणणे) चा गुन्हा दाखल केलाय. सोबतच दोन्ही गटांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी २९४, ५०६ आणि ३२३ (शिवीगाळ, धमकी देणे आणि धक्काबुक्की करणे) चा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

विशेष म्हणजे तक्रार देण्यासाठी उभे असलेले काशीकर यांच्यावर पोलीस ठाण्यात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, अचानक झालेला हा हल्ला सोडविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता पोलिसांवर सुद्धा हात उगारण्याचा प्रयत्न झाला.

चंद्रपुरात दिवसेंदिवस राजकीय गुंड प्रवृत्ती फोफावत चालली असून पोलिसांनी आतातरी या वृत्तीवर लगाम घालावा अन्यथाया भविष्यात मोठी घटना घडल्याशिवाय राहणार नाही, जेव्हा पोलीस ठाण्यात हल्ला होतो तेव्हा कुठेतरी कायद्याची वचक तर कमी झाली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here