Home चंद्रपूर सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे विरोधी पक्षनेते मा.विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध...

सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे विरोधी पक्षनेते मा.विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम.

सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे विरोधी पक्षनेते मा.विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम.

रक्तदान, डोळे तपासणी व चष्मा वाटप तसेच आरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-   सावली तालुका- राज्याचे विरोधी पक्षनेते,माजी मंत्री, ब्रम्हपुरी- सावली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आद.शिवानीताई वडेट्टीवार यांच्या संयुंक्त अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्याने सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मौजा.कवठी येथे रक्तदान शिबीर, डोळे तपासणी व चष्मा वाटप तसेच आरोग्य शिबिर हे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.*

*लोकनेते,विकासपुरुष मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार हे जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानत गोर गरीब, शेतकरी सामान्यजनतेच्या सुखा दुःखात सहभागी होतात,सेवभावी उपक्रम राबवीत असतात आज त्यांचीस प्रेरणा घेऊन कवठी येथे विविध समाजिक उपक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटणुरवार,अध्यक्षस्थानी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने, तर प्रमुख उपस्थिती म्हणून सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार, माजी पंचायत समिती सभापती मा.विजय कोरेवार नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे, उपंगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार, सामाजिक कार्यकर्ते मा.निखिल सुरमवार उपस्थित होते.*

*या सामाजिक उपक्रमाला सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.पुरषोत्तम चुदरी,ग्रामपंचायत कवठीच्या सरपंच सौ.कांताबाई बोरकुटे,उपसरपंच मा.राकेश घोटेकार,उसेगावचे सरपंच मा.चक्रधर दुधे,उपसरपंच मा.सुनील पाल,गाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.गंगाधर येलमुळे,घोडेवाहीचे उपसरपंच मा.चेतन रामटेके, महिला शहर अध्यक्षा सौ.भारती चौधरी, न.प.बांधकाम सभापती सौ.साधना वाढई, आरोग्य स्वच्छता सभापती मा.अंतबोध बोरकर,महिला व बाल कल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे,सेवा सोसायटी राईसमिल अध्यक्ष मा.मोहन गाडेवार, नगरसेवक मा.प्रफुल वाळके,मा.प्रितम गेडाम,मा.गुणवंत सुरमवार,नगरसेविका सौ.अंजली देवगडे,सौ.ज्योती गेडाम,सौ.प्रियंका रामटेके,सौ.पल्लवी ताटकोंडावार,सौ.सीमा संतोषवार, मा.प्रशांत राईंचवार, माजी ग्रा.प.सदस्या सौ.कविता मुत्यालवार ,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.खुशाल राऊत,मा.प्रकाश घोटेकर,मा.ईश्वर बट्टे,मा.किशोर घोटेकार,ग्रा.प.सदस्य कवठी मा.विलास बट्टे, सौ.संगीता पाल, सौ.मनीषा कोसरे तसेच,मा.श्रीकांत बहिरवार, मा.आकाश बुरीवार,मा.राजू बुरीवार,मा.बादल गेडाम,मा.यश गेडाम आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक बहुसंख्यने उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here