Home चंद्रपूर श्री नवयुग बाल गणेश मंडळ दत्तनगर एक दोन नाही तर तब्बल चौथ्यांदा...

श्री नवयुग बाल गणेश मंडळ दत्तनगर एक दोन नाही तर तब्बल चौथ्यांदा प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे काढली विजय मिरवणूक

 

 

 

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  श्री नवयुग बार गणेश मंडळ दत्तनगर नागपूर रोड चंद्रपूर मागील चार वर्षापासून पर्यावरणाचे उत्कृष्ट देखावे, पर्यावरण संवर्धन संदर्भात विविध संदेश देत प्रथम क्रमांक प्राप्त करत आहे. यावर्षी सुद्धा चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेत भाग घेऊन पर्यावरण पूरक सजावट करून व पर्यावरण  जनजागृती देखावा साकारून पर्यावरण पूरक प्रथम क्रमांक नुकताच प्राप्त केला आहे.

या पुरस्कारांमध्ये प्रमाणपत्र, शिल्ड व एक लाख 51 हजार रुपयाचे पारितोषिक पटकावले. सोबतच चंद्रपूरचे पालकमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्याद्वारे आयोजित गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक घेत 51 हजार रुपयाचे पारितोषिक प्राप्त केले. या दोन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे गणेश मंडळाच्या वतीने गांधी चौक पासून विजय मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीची सुरुवात इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी गणेश मंडळाला शुभेच्छा देऊन गांधी चौक येथून सुरू केली तसेच लोकमान्य शाळेच्या जवळ चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर गोपाल मुंदडा व इतर सदस्य यांनी मिरवणुकीचे स्वागत व शुभेच्छा दिल्या, तर वरोरा नाका चौक येथे राजेश नायडू व पर्यावरण तज्ञ व ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी गणेश मंडळाला शुभेच्छा देऊन स्वागत केले.

त्यानंतर जनता कॉलेज चौक येथे माजी महापौर राखी कंचरलावार  व माजी गटनेते देवानंद वाढई यांनी गणेश मंडळाला पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले. परिसरातील अनेक लोकांनी सलग चार वर्षे पर्यावरणाचे देखावे साजरे करून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल अनेकांनी अभिनंदन केले. या मिरवणुकीत दत्तनगर येथील गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, महिला व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here