Home चंद्रपूर साकार होणार असलेल्या समाज भवनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व्हावा –...

साकार होणार असलेल्या समाज भवनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व्हावा – आ. किशोर जोरगेवार घुग्घुस येथील तुकडोजी महाराज समाज भवनाच्या कामाचे आमदार जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन

साकार होणार असलेल्या समाज भवनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व्हावा – आ. किशोर जोरगेवार

घुग्घुस येथील तुकडोजी महाराज समाज भवनाच्या कामाचे आमदार जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-  घुग्घुस तुकडोजी महाराज हे एक मार्गदर्शक, शिक्षक, आणि मार्ग सूचक होते. त्यांनी लिहिलेले ग्रंथ अत्यंत मौल्यवान आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एक महान संत, साहित्यिक, आणि सामाजिक कार्यकर्ते होते, समाज परिवर्तनासाठी त्यांनी मोठे काम केले. त्यांच्या विचाराची आवान – घेवाण व्हावी, सामाजिक कार्यक्रम पार पडावेत यासाठी आपण 30 लक्ष रुपयांच्या निधीतून येथे समाज भवन तयार करत आहोत. याचे भुमिपूजन करतांना आनंद होत असून साकार होत असलेल्या समाज भवनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व्हावा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगवार यांनी केले.
घुग्घुस येथे वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 55 व्या पूण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आली होते. या कार्यक्रमात आमदार निधीतून मंजुर 30 लक्ष रुपयांच्या समाज भवनाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या भुमिपूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, चांदा शिक्षण प्रसारक मंडळचे सचिव अशोक जीवतोडे, सामाजिक कार्यकर्ते विवेक बोढे, सामाजिक कार्यकर्ता राजु रेड्डी, जनविकास परिक्षा जिल्हा संघटक, विजय चिताडे, आजिवन प्रचारक अन्नाजी ढवस, ग्रामगीताचार्य प्रेमलाल पारधी, गोपाल एकरे, गुरुदेव प्रचारिका कमल गळधे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
भजन किर्तनात व्यसनमुक्तीची ताकत आहे. आपण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही दरवर्षी महाशिवरात्री निमित्त भजन महोत्सवाचे आयोजन करत आहोत. यंदा या आयोजनाचे दुसरे वर्ष होते. यात विविध भाषीय जवळपास ३०० भजन मंडळांनी सहभाग घेत भजन महोत्सवाची भव्यता वाढवली. विशेष म्हणजे लहान मुलांच्या भजन मंडळांनीहि या भजन महोत्सवात सहभाग घेतला होता. चंद्रपूरात आपण माता महाकाली महोत्सवाला सुरवात केली आहे. या महोत्सवा गुरुदेव सेवा मंडळाचे मोठे सहकार्य आपल्याला लाभत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
आपण श्री सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाच्या ध्यान प्रार्थना मंदिर येथे समाज भवन देण्याचा शब्द दिला होता आज तो पुर्ण करता आला याचे समाधान आहे. आज लोकप्रतिनी म्हणून निधी वाटप करण्याचा अधिकार आमच्याकडे आहे. मात्र तो वाटत असतांना समाजाच्या उपयोगी आला पाहिजे याकडे माझे विशेष लक्ष राहिले आहे. आज अनेक ठिकाणी आपण समाज भवन आणि अभ्यासिका तयार करत आहोत. यातुन समाजाला दिशा मिळण्याचे काम होणार आहे. आज आपण येथील 30 लक्ष रुपयाच्या समाज भवनाचे भुमिपूजन केले आहे. या समाज भवनातून सामाजिक आणि धार्मीक कार्यक्रमाअंतर्गत समाजाच्या प्रबोधनाचे काम होईल असा विश्वास यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here