Home Breaking News चंद्रपूरकरांनो पाणी सांभाळून वापरा. आता जेवढे वापरणार पाणी, तेवढेच येणार बील

चंद्रपूरकरांनो पाणी सांभाळून वापरा. आता जेवढे वापरणार पाणी, तेवढेच येणार बील

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

कसा राहणार प्रति युनिट घरगुती, बिगर घरगुती, संस्थात्मक, व्यावसायीक, औद्योगिक पाणीकर दर

चंद्रपूर  :-  महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) लावण्यात आले असून १ जानेवारी २०२४ पासून याचा प्रत्यक्ष वापर सुरु होणार आहे. यापुढे पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येणार असल्याने अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण येणार आहे. चंद्रपूर शहरास ईरई नदी व धरणावरून पाण्याची उचल करून,रामनगर व तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया करून १६ जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो.

शहराची गरज पाहता सध्या ४५ दशलक्ष लिटर पाण्याचे वाटप मनपाद्वारे दररोज करण्यात येते. आतापर्यंत नळ जोडणी धारकांकडून वार्षिक पाणीपट्टी कर घेतला जात होता आणि तो सर्वांना सारखाच लागू होता.त्यामुळे पाण्याचा किती वापर प्रत्येकाकडून केला जातो याचा अंदाज बांधणे कठीण होते. आता मीटर सुरू झाल्याने आवश्यक तेवढेच पाणी वापरले जाऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यास मदत होणार आहे.

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात अमृत योजना सुरू होण्यापूर्वी शहरात ३५ हजार अधिकृत नळ कनेक्शन होते. आजच्या घडीलाअमृत योजनेअंतर्गत त्यात वाढ होऊन ६० हजार पर्यंत नळ कनेक्शन देण्यात आलेले आहेत. आता नळजोडणीवर मीटर लागल्यामुळे त्या मीटरचा वापर १ जानेवारी २०२४ सुरु होणार असून त्रैमासिक ( ३ महिन्यांचे ) बील दिले जाणार आहे.

 

कसा राहणार प्रति युनिट घरगुती, बिगर घरगुती, संस्थात्मक, व्यावसायीक, औद्योगिक पाणीकर दर

युनिट (१००० लीटर)

१ ते २५  रू. १२.००

२६  ते  ४०  रू. १५.००

४० पेक्षा जास्त दर प्रति युनिट  रू. १८.००

ग्राहकाने पाणी वापरल्यास किंवा न वापरल्यास कमीत कमी देयक

(सेवा शुल्क)  रू. १२५.००

घरगुती  रू. १२.००

बिगर घरगुती  रू. २४.००

संस्थात्मक    रू. २४.००

व्यावसायीक  रू. ३६.००

औद्योगिक  रू. ८४.००

बील प्राप्त होताच १५ दिवसात बील भरणाऱ्यांना १५ टक्के त्यानंतरच्या १५ दिवसात बील भरणाऱ्या नळ जोडणी धारकांना ५ टक्के सवलत दिली जाणार आहे; तर थकबाकी असल्यास २ टक्के व्याज लावले जाणार आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांनो पाणी सांभाळून वापरा. आता जेवढे वापरणार पाणी, तेवढेच येणार बील !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here