Home भद्रावती संतापजनक:- भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एमटा कोळसा खाणीतून कोट्यावधीची कोळसा चोरी.

संतापजनक:- भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एमटा कोळसा खाणीतून कोट्यावधीची कोळसा चोरी.

भाजप कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष उमेश बोडेकर यांची सीबीआय कडे तक्रार. कोळसा खान बंद करण्याचा इशारा.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेल्या कर्नाटका सरकार च्या kpcl कोळसा खाणीतुन निघालेल्या कोळंशाची मोठया प्रमाणात चोरी होतं आहे व तो कोळसा खुल्या बाजारात बेकायदेशीर विक्री करून कर्नाटकात जाणाऱ्या कोळशात ओव्हर बर्डन ची काळी माती मिक्स करण्यात येत असल्याने याची सखोल चौकशी करून शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल लुटणाऱ्या कर्नाटका एमटा च्या मालक अधिकारी व ट्रान्सपोर्टर यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी भाजप कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष उमेश बोडेकर यांनी सीबीआय कडे केली आहे. दरम्यान इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या कोळसा चोरीतून आपली पोळी शेकली असल्याची पण माहिती समोर आली असून ते राजकीय नेते कोण हे लवकरच पुढे येणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेल्या कर्नाटका सरकार च्या kpcl कोळसा खाणीतुन निघालेल्या कोळंशाची खुल्या बाजारात बेकायदेशीर विक्री करून कर्नाटकात जाणाऱ्या कोळशात ओव्हर बर्डन ची काळी माती मिक्स करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार सुरु आहे, या कोळसा खाणीचे उत्खनन व वाहतूक करण्याचे काम ज्या कर्नाटका एमटा ला देण्यात आले त्या कंपनीचे मालक गौरव उपाध्याय व ट्रान्सपोर्टर मिळून दररोज हजारो टन कोळसा खुल्या बाजारात विकत आहे, दरम्यान शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवून कोट्यावधी रुपये कंत्राटी कंपन्या व अधिकारी यांच्या खिशात जात आहे. या कंपनीच्या कोळसा खाणीतून निघालेल्या कोळशात या खदानीतुन निघणाऱ्या ओबी ला काळ्या चुरीत मिक्स करून ते मिक्स झालेली ओबी मग 50 टक्के कोळशांत मिसळली जाते आणि तो मिक्स झालेला कोळसा पॉवर प्लांट ला पाठवला जातो. हा खेळ रात्रीच्या अंधारात रात्री 12 नंतर खेळला जात आहे.

Kpcl च्या या कोळसा खाणीत चाललेल्या या गैरप्रकाराची तक्रार स्थानिक प्रशासनाला देऊन सुद्धा कुठलीही कार्यवाही होतं नाही, कारण यामध्ये सर्वच सामील आहे आणि सर्वाना त्यांचा हिस्सा जात आहे. दरम्यान या खाणीतून कोळसा चोरीचे काम रात्रीत हायवा ट्रक ने होतं असून नंदोरी टोल टॅक्स मार्गे हे ट्रक नागपूर ला जात आहे, जर या टोल नाक्यावर सिसिटीव्ही फुटेज चेक केले तर याचा भंडाफोड होईल, दरम्यान ही कोळसा चोरी हजारो टन कोळंशाची असून शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल यामुळे बुडत आहे त्यामुळे या गंभीर प्रकाराची दखल घेऊन त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी आणि त्यांच्यावर राष्ट्रीय संपत्तीची अफरातफर प्रकरणी व भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करावी अन्यथा भाजपा कामगार आघाडी तर्फे या कंपनी विरोधात कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा उमेश बोडेकर यांनी सीबीआय, राष्ट्रीय सतर्कता आयोग, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here