Home Breaking News टिळक भवन दादर, मुंबई येथे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रभारी श्री.रमेश...

टिळक भवन दादर, मुंबई येथे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रभारी श्री.रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारिणीची बैठक पार पडली

टिळक भवन दादर, मुंबई येथे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रभारी श्री.रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत

प्रदेश काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारिणीची बैठक पार पडली.

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर

महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढणार आहे. बूथ कमिटी वर कार्यकर्त्यांनी नियोजन करून काम केले पाहिजे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त खासदार निवडून येतील यासाठी पक्षाने मजबुती बांधणी केली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी अधिक जागा निवडून आणण्यासाठी पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारून जबाबदारीने काम करायला माझ्यासह पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते तयार आहे.

बैठकीला प्रदेशाध्यक्ष श्री.नानाभाऊ पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते श्री.बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य श्री.अशोक चव्हाण, श्री.माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री श्री.सुशीलकुमार शिंदे, विधान परीक्षेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, श्री.चंद्रकांत हांडोरे, श्री.बस्वराज पाटील, माजी मंत्री वर्षाताई गायकवाड, आमदार प्रणिती शिंदे, श्री.कुणाल पाटील, यांच्यासह सर्व प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here