Home चंद्रपूर कवठी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण सोहळा संपन्न युवकांनी वाईट व्यसनापासून दूर...

कवठी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण सोहळा संपन्न युवकांनी वाईट व्यसनापासून दूर राहावे, उच्च शिक्षित होऊन देशसेवा करावी– नितीन गोहने

कवठी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण सोहळा संपन्न

युवकांनी वाईट व्यसनापासून दूर राहावे, उच्च शिक्षित होऊन देशसेवा करावी– नितीन गोहने

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-सावली तालुक्यातील मौजा.कवठी येथे श्री.गुरुदेव सेवा मंडळ कवठी व ग्रामवासीय जनतेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा अगदी आनंदमय व शांत वातावरणात पार पडला.सर्व प्रथम राष्ट्रासंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तत्पश्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामगिता व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.*

*कार्यक्रमाला सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,कवठीच्या सरपंच सौ.कांताबाई बोरकुटे,उपसरपंच मा.राकेश घोटेकर,उसेगावचे उपसरपंच मा.सुनील पाल, गाव तंटामुक्ती अध्यक्ष व पत्रकार मा.टीकाराम म्हशाखेत्री,पोलीस पाटील मा.सचिन शीडाम, शहिद सुरकर विद्यालयाचे प्राचार्य मा.खोब्रागडे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याधापक मा.भोयर सर ,गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष कवठी मा.बेंदूजी बोरकुटे,मा.मुखुरुजी राजूरकर, गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष उसेगाव मा.अरुण पाल,मा.शेखर प्यारमवार सर, ग्राम पंचायत सदस्य मा.विलास बट्टे,कीर्तनकार पं.बावणे महाराज,वडेगाव आदी उपस्थित होते.*

*कार्यक्रमाला संबोधित करताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांनी “महाराष्ट्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामपातळीवर भजन-कीर्तनाच्या माध्यमातून अखंडपणे लोकशिक्षणासाठी ज्यांच्या चिपळ्या थिरकल्या, आवाज कडाडला आणि त्यातून त्यांची उद्‍बोधनाची तळमळ अतिशय प्रभावीपणे जनमानसापर्यंत पोचली.आपल्या गद्य-पद्य लेखणीतून चिपळ्या किंवा खंजिरी या वाद्यांच्या सहाय्याने भजनाच्या माध्यमातून परंपरागत अनिष्ट रूढी, जाती-धर्म-पंथ-भेद, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, हरिजन मंदिर प्रवेशबंदी अशा समाजघातक रूढींवर कठोर प्रहार करून त्यांनी ईश्वराचं विशुद्ध स्वरूप लोकांसमोर मांडलं. त्यामुळे सर्वधर्मीय, सर्वपंथीय लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले.त्यांनी आई वडिलांची सेवा, शिक्षण यांना महत्व दिले त्यांच्या विचारातूनच देशाची प्रगती शक्य आहे असे ते म्हणाले.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here