Home वरोरा स्वागत:- मनसे नेत्या शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे यांचे वरोरा नगरीत उद्या होणार आगमन.

स्वागत:- मनसे नेत्या शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे यांचे वरोरा नगरीत उद्या होणार आगमन.

हजारोच्या संख्येने वरोरा आनंदवन चौकात मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते करणार स्वागत,. महिलांची राहणार मोठी उपस्थिती

वरोरा प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या पत्नी तथा मनसे नेत्या शर्मिलाताई ठाकरे. मनसे महिला सेना राज्य उपाध्यक्षा रिटाताई गुप्ता या वणी येथील पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या “शिव महापुराण कथा”सप्ताह कार्यक्रमात सहभागी होणार असून उद्या दिनांक 1 फेब्रुवारी ला सकाळी 12.00 च्या दरम्यान वरोरा येथील आनंदवन चौकात मनसे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचे जंगी स्वागत करणार आहे. वणी येथे मनसे नेते राजू उंबरकर यांच्या आग्रहाच्या निमंत्रणाला मान देऊन त्यांची शिव महापुराण सप्ताह कार्यक्रमात हजेरी लक्षवेधक राहणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वरोरा विधानसभा क्षेत्रात संघटन बांधणी चांगली असल्याने त्यात पुन्हा भर पडावी या उद्देशाने मनसेचे पदाधिकारी उद्या वरोरा येथील आनंदवन चौकात भव्य स्वागत करणार आहे. विशेष म्हणजे या स्वागत कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होणार असून जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या स्वागत कार्यक्रमाला उपास्थित राहावे असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी, महेश वासलवार, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, रमेश काळबांधे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आंनद बावणे, महिला सेना तालुका अध्यक्षा रेवती इंगोले, विशाल देठे, राम पाचभाई, मोहित हिवरकर, प्रशान्त बदकी, प्रतीक मुडे. राजेंद्र धाबेकर गजू वादाफळे, पवन ढोके, दिलीप उमाटे, संदीप मोरे, धनराज बाटबरवे, किशोर धोटे, सुनील पाझारे, संदीप धानोरकर इत्यादीनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here