Home चंद्रपूर मनसेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभाग चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी मनोज तांबेकर.

मनसेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभाग चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी मनोज तांबेकर.

महाराष्ट्र सैनिक ते जिल्हाध्यक्ष पदावर पोहचणाऱ्या मनोज तांबेकर यांच्या पक्षनिष्ठेने मिळाली संधी.

महाराष्ट्र नवनिर्माण हा तरुणांचा पक्ष म्हणून ओळखल्या जातो, या पक्षात पक्ष स्थापनेच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत पक्षासाठी काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्याना मनसेची मोठमोठी पदे मिळाली व कार्यकर्त्यांचे ते नेते झाले, असेच एक सामान्य कार्यकर्ता ते चंद्रपूर शहर संघटक व आता मनसेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभाग चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी पोहचणाऱ्या मनोज तांबेकर यांची कारकीर्द पक्षासाठी महत्वाची ठरली आहे.

*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांनी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तुषार भाऊ गिऱ्हे, विभाग संघटक साहिल बेहरे व व्यापारी सेना विभाग संघटक चेतन बोरकुटे यांच्या उपस्थितीत मनोज तांबेकर यांची रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केली, त्यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्याच्या सहा विधानसभा क्षेत्राचा कारभार सोपविण्यात आला असून तरुणांना स्थानिक कंपनीमध्ये नौकरी व रोजगार मिळवून देण्यासाठी व बेरोजगार तरुणांना स्वतःचा स्वयंरोजगार करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन असे आश्वासन मनोज तांबेकर यांनी यावेळी दिले. त्यांच्या या नियुक्तीने पक्षाला पुन्हा बाळकटी मिळेल असा आशावाद रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांनी व्यक्त केला.

सुतार समाजाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा कॉरंपेंटर असोसिएशन चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या मनोज तांबेकर यांची रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने त्यांचे विविध स्थरावरून अभिनंदन होतं आहे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, मनदीप रोडे, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जनहीत जिल्हाध्यक्ष सुनील गुढे. रमेश काळबांधे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी, महेश वासलवार, व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, जनहीत कक्ष विभाग शहर अध्यक्ष पियुष धुपे, जिल्हा उपाध्यक्ष विजय तूरक्याल, कुलदीप चंदनखेडे, विवेक धोटे इत्यादीनी त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here