Home Breaking News शिवरत्न सेने’चे संस्थापक, अध्यक्ष श्री. प्रदीप उमरे यांनी ‘मुंबई’ येथे पर्यावरण अभ्यासक...

शिवरत्न सेने’चे संस्थापक, अध्यक्ष श्री. प्रदीप उमरे यांनी ‘मुंबई’ येथे पर्यावरण अभ्यासक तथा बांबू लागवड अभियानाचे प्रणेते पाशा पटेल यांची घेतली ‘सदिच्छा’ भेट..

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

मुंबई (चंद्रपूर)  :-  माजी आमदार, माजी अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग (महाराष्ट्र), गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, भारतीय नियामक मंडळ तथा सदस्य राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायतराज समिती संस्था श्री. पाशा पटेल यांची मंत्रालयासमोरील जनरल जगन्नाथराव भोसले मार्गावरील नरिमन पॉइंट, येथील यंशवंतराव चव्हाण सेंन्टर मुंबई येथे ‘शिवरत्न सेने’चे संस्थापक/अध्यक्ष प्रदीप उमरे यांनी पाशा पटेल यांची नुकतीच ‘सदिच्छा’ भेट घेतली!

पाशा पटेल यांचे पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांसाठी लढा हे कार्य अद्वितीय, अप्रतिम असून, ते देशभर बांबू लागवडीसाठी करीत असलेल्या प्रचार आणि प्रसारामुळे पर्यावरण संतुलनाबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट झाली

त्यांच्या या कार्याला आमच्यासारख्या चळवळीतल्या प्रत्येक ‘पक्ष-संघटने’च्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष सहकार्य करावे असे मत ‘शिवरत्न सेने’चे अध्यक्ष प्रदीप उमरे यांनी त्यांच्यासमक्ष व्यक्त केले, लातूर येथे बांबू संशोधन केंद्र उभारून महाराष्ट्रात ‘१२’ कोटी रोपे लावण्याचे व्रत घेतलेले पाशा पटेल हे महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तीमहत्त्व आहेत,

सामाजिक पर्यावरण संरक्षणाचे कार्य हाती घेऊन पाशा पटेल यांनी चालवलेली चळवळ तसेच शेतकऱ्यांसाठी देत असलेला लढा निश्चितच प्रेरणादायी आहे, पर्यावरणाचा समतोल बिघडत चालल्याने अनेक दुष्परिणाम दिसून येत आहे, त्यापैकी वायू प्रदूषण ही मोठी समस्या बनली आहे,

इंधन म्हणून वापरले जाणारे पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा या घटकांना पर्याय शोधण्यात केंद्र सरकार सातत्याने विचार करीत असून पेट्रोल, डिझेलला पर्याय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांबू वापराचे आवाहन केले आहे, त्यांची ही संकल्पना प्रत्यशात उतरविण्यासाठी पाशा पटेल यांनी देशभरात हजारावर सहभाग, जनजागृती सुरू केली आहे.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी बांबू लागवड अत्यंत महत्वाची ठरत आहे, बांबूपासून इथेनॉल निमिर्तीही शक्य आहे! कोविड काळात प्राणवायूचे महत्व सर्वांना समजले आहे प्राणवायू तुटवड्यामुळे अनेक जिल्ह्यात रुगनांना समस्यांना तोंड ध्यावे लागले आहे, बांबूचे एक झाड वर्षाकाठी ‘३००’ किलो प्राणवायू निर्माण करते सोबतच बांबू हा बहुगुणी वृक्ष आहे,

पटेलजींच्या कार्यास उत्तस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगून प्रदिप उमरे यांनी त्यांच्या या अभियानाला मन:पूर्वक ‘शुभेच्छा’ दिल्या! या ‘सदिच्छा’ भेटीप्रसंगी श्री. प्रफुल्लजी मारकपवार (वरीष्ट पत्रकार, मुंबई) श्री. संजयजी भुस्कुटे (निवेदक/सूत्रसंचालक, मुंबई) तसेच इजि. राहुलजी पिदूरकर (नवी मुंबई) श्री. पंकजजी टिपले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती!!*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here